मुंबई : मनसेचे आमदार राजू पाटील अंमलबजावणी कार्यालयात पोचल्याचे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या तसेच राजकीय चर्चेला उधाण आले. परंतु, माझ्याशी संबंधित प्रकरणात साक्ष देण्याबाबत मी अंमलबजावणी कार्यालयात गेलो होतो, आणखी काही वेगळे नाही,अशी माहिती मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिली. MNS MLA in ED office; sparked political debate
आमदार राजू पाटील म्हणाले, माझी एका प्रकरणात माझी साक्ष आहे. 23 जून रोजी मी साक्ष देऊन आलो होतो. आता माझी काही गरज लागणार आहे का? हे विचरण्यासाठी ईडी कार्यालयात गेलो होतो.
2015 मध्ये मुंंबई क्राईम ब्रांचने दयानंद जाटान आणि विपीन पाटील यांना अटक केली होती. डोंबिवलीत राहणारा विपीन पाटील हा मोठा दारु विक्रेता आहे. या दोघांवर गंभीर आरोप होते. ठाणे जिल्ह्यातील कोणत्या व्यक्तीकडे जास्त पैसा आहे. कोणत्या बिल्डरेच काम सुरु आहे. कोणत्या नेत्याला धमकी दिल्याने फायदा होईल, ही सर्व माहिती परदेशात बसलेल्या कुख्यात डॉन रवी पूजारीला देत होते.
मनसेचे नेते व विद्यमान आमदार राजू पाटील यांच्या संदर्भातील माहिती आणि त्यांची सुपारी सुद्धा रवी पुजारीला देण्यात आली होती. या दोघांनी 15 लाख रुपये रवी पुजारीला पाठविले होते. त्यावेळी हे प्रकरण गाजल होत. सध्या रवी पुजारीला अटक करुन भारतात आणले आहे. रवी पूजारीशी संबंधित सगळ्य़ा गुन्हयांचा तपास सुरु आहे. राजू पाटील यांची सुपारी विपीन याने दिल्या प्रकरणी मनसे आमदार हे साक्षीदार आहेत. ईडीने जबाब नोंदविण्यासाठी 23 जून रोजी समन्स बजावला होता. ते जबाब देऊन आले आहे. आज या प्रकरणात त्यांची काही गरज आहे का ? हे विचारण्यासाठी ईडीच्या कार्यालयात गेल्याची माहिती राजू पाटील यांनी दिली.
- मनसेचे आमदार राजू पाटील ईडीच्या कार्यालयात
- ते का गेले ? राजकीय चर्चेला उधाण आले
- जुन्या प्रकरणात साक्षीबाबत गेल्याचे पाटील म्हणाले
- रवी पुजारीला 15 लाख रुपयांची सुपारीचे प्रकरण
- दोन आरोपींनी 2015 मध्ये सुपारी दिली होती
- या प्रकरणात ईडीने साक्ष देण्याचे समन्स बजावले
- 23 जूनला त्यांनी साक्ष दिली होती