• Download App
    मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला, मॉर्निंग वॉकवेळी लोखंडी रॉड, स्टम्पने मारहाण; रुग्णालयात दाखल|MNS leader Sandeep Deshpande fatally attacked, beaten with iron rod, stump during morning walk; admitted to hospital

    मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला, मॉर्निंग वॉकवेळी लोखंडी रॉड, स्टम्पने मारहाण; रुग्णालयात दाखल

    प्रतिनिधी

    मुंबई : मनसेचे नेते तसेच माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. मॉर्निंग वॉकसाठी ते जात असताना शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावू आल्याचे सांगण्यात येत आहे. संदीप देशपांडे यांना बेदम मारहाण करून हल्लेखोरांनी पोबारा केला. या हल्ल्यामध्ये संदीप देशपांडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले.MNS leader Sandeep Deshpande fatally attacked, beaten with iron rod, stump during morning walk; admitted to hospital



    नेहमीप्रमाणे संदीप देशपांडे मॉर्निंग वॉककरिता शिवाजी पार्कमध्ये गेले होते. यावेळी अचानक काही मास्कधारी लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना रॉड आणि स्टम्पने बेदम मारहाण करण्यात आली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संदीप देशपांडे प्रतिकार करू शकले नाही. ते जखमी होऊन खाली पडले. या हल्ल्यानंतर शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हल्लेखोर पसार झाले. त्यानंतर स्थानिकांनी देशपांडे यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केले. संदीप देशपांडे जबर जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. हल्ल्याची माहिती मिळताच मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हिंदुजा रुग्णालयाकडे धाव घेतली

    MNS leader Sandeep Deshpande fatally attacked, beaten with iron rod, stump during morning walk; admitted to hospital

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!