‘’आयोगाने नवीन प्रश्नपत्रिका काढून ही परीक्षा घ्यायला हवी.’’ अशी मागणीही अमित ठाकरेंनी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या गट ब आणि क संयुक्त पूर्व परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रं मागील काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. टेलिग्राम लिंकद्वारे जवळपास ९० हजारांहुन जास्त विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रमाणपत्र लिक झाल्याची माहिती समोर आली आहे. एवढच नाही तर ही लिंक व्हायरल करणाऱ्याकडे संयुक्त पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिकाही असल्याची खळबळजनक माहिती आहे. एकूण एमपीएससीच्या सगळ्या गलथान कारभारावर पुन्हा एकदा टीका होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी या प्रकाराच्या चौकशीची मागणी करत, नव्याने प्रश्नपत्रिका काढण्याची देखील मागणी केली आहे. MNS leader Amit Thackerays reaction on MPSC Data Leak case
मनसे नेते अमित ठाकरे यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे की, ‘’गेल्या काही वर्षांत एमपीएससीचा पेपर फुटला, परीक्षा केंद्रांवर गोंधळ, निकाल दिरंगाई अशा बातम्यांची महाराष्ट्राला सवय झाली; पण आजचं MPSC Data Leak प्रकरण धक्कादायक आहे. ‘’
याचबरोबर ‘’अवघ्या सात दिवसांवर आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रं, आयोगाकडे असलेली विद्यार्थ्यांची सर्व माहिती तसंच प्रश्नपत्रिका आपल्याकडे असल्याचा दावा कुणी समाजमाध्यमांवर करत असेल, तर हे खूपच गंभीर प्रकरण आहे. उच्चस्तरीय समिती नेमून या प्रकरणाची तत्काळ चौकशी व्हायला हवी. तसंच, आयोगाने नवीन प्रश्नपत्रिका काढून ही परीक्षा घ्यायला हवी. ‘’ अशी मागणी त्यांनी केली आहे.
याशिवाय ‘’ ‘डेटा खूप मौल्यवान आहे’ हे ओळखून यापुढे एमपीएससीची वेबसाईट हॅकर्सकडून हॅक होणार नाही किंवा डेटा लीक होणार नाही, यासाठी आयोगाने एथिकल हॅकर्स आणि आयटी-डेटा एक्सपर्ट्सच्या सहकार्याने सर्वतोपरी तांत्रिक दक्षता घ्यायला हवी आणि आपली विश्वासार्हता जपायला हवी. अन्यथा, विद्यार्थ्यांना वारंवार धक्के देणाऱ्या गलथान कारभारामुळे या आयोगाची ‘महाराष्ट्र पब्लिक शॉकिंग कमिशन’ हीच ओळख सर्वांच्या मनात कायम होईल. ‘’ असंही अमित ठाकरेंनी म्हटलं आहे.
MNS leader Amit Thackerays reaction on MPSC Data Leak case
महत्वाच्या बातम्या
- कुपोषण संपवण्यासाठी राज्य सरकारची अनोखी मोहीम; अन्नाचा दर्जा तपासणाऱ्या ‘AI’ यंत्राचं लोकार्पण
- आसाम युवक काँग्रेसच्या महिला अध्यक्षाला छळणाऱ्या युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षांविरुद्ध आसाम पोलिसांची कठोर कायदेशीर कारवाई
- जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा देताना खासदार अमोल कोल्हेंनी दाखविली राजकीय प्रवासाची सूचक दिशा!!
- बुलढाण्याच्या भेंडवळ घटमांडणीचे भाकीत : राजा कायम राहणार, पण रोगराई पसरण्याची धोका, वाचा पावसाचा अंदाज