विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raheel Khan दारूच्या नशेत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेच्या गाडीला धडक देणे, अपमानास्पद भाषा वापरणे आणि धमकी देणे, अशा गंभीर प्रकारात अडकलेल्या राहील खान या याच्यापासून मनसेने स्पष्टपणे अंतर ठेवले आहे. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी यासंदर्भात परिपत्रक काढून सांगितले की, राहील हा मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष जावेद शेख यांचा मुलगा असला तरी, त्याच्या वर्तनाशी पक्षाचा कोणताही संबंध नाही. त्याच्या वर्तनाचे समर्थन मनसे करत नसून, पोलिसांनी त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.Raheel Khan
राजश्री मोरेने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये राहील खान हा मद्यधुंद अवस्थेत असून तिच्या कारला धडक दिल्यानंतर “मी तुला विकत घेऊ शकतो”, “मी जावेद शेखचा मुलगा आहे”, अशी धमकी देत असल्याचे स्पष्ट दिसून येते. अपघातानंतर राहीलने राजश्रीला शिवीगाळ करत पैशाची ऑफर देऊन तक्रार न करण्याचा सल्ला दिला. मात्र, जेव्हा प्रकरण आंबोली पोलिस ठाण्यात पोहोचले, तेव्हा तिथेही त्याने रात्रभर धिंगाणा घातल्याचे समोर आले आहे.
या व्हिडिओमध्ये राहील हा अर्धनग्न अवस्थेत आणि दारूच्या नशेत राजश्रीसोबत हुज्जत घालताना दिसतो. या प्रकरणानंतर पोलिसांनी राहीलविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
मनसेने या प्रकरणावर अधिकृत पत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “जावेद शेख हे आमचे पक्षाचे पदाधिकारी आहेत, मात्र त्यांच्या मुलाने जे कृत्य केले आहे, त्याची जबाबदारी पक्ष घेणार नाही. त्या कृतीचा मनसे निषेध करतो. पोलीस प्रशासनाने कायद्यानुसार कारवाई करावी,” असे जाधव यांनी म्हटले आहे.
हा पहिलाच प्रसंग नाही, जेव्हा राजश्री मोरे आणि मनसे आमनेसामने आले आहेत. यापूर्वी मराठी भाषेच्या सक्तीविषयी मनसेने केलेल्या विधानावर तिने नाराजी व्यक्त केली होती. “इतरांवर भाषा लादण्याऐवजी स्थानिकांनी अधिक मेहनत करावी,” असे म्हणत तिने मुंबईतील स्थलांतरितांचे समर्थन करत वादाला तोंड फोडले होते.
या विधानानंतर मनसे कार्यकर्त्यांनी तिच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राजश्रीने सार्वजनिक माफी मागून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवला होता.
MNS condemns Raheel Khan’s behavior, has no connection with the party; demands police action
महत्वाच्या बातम्या
- Trump Extends Tariff ट्रम्प यांनी टॅरिफची डेडलाइन 1 ऑगस्टपर्यंत वाढवली; जपान-दक्षिण कोरियावर प्रत्येकी 25% कर लादला
- Tejaswi Yadav : बिहारमधील जंगलराजची आठवण, तेजस्वी यादव यांच्याकडून मुस्लिम तृष्टीकरणासाठी गुंडांचे समर्थन
- Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले- ग्रामीण भागाचा विकास-रोजगार निर्मिती हाच आपल्या अर्थव्यवस्थेचा खरा पाया असावा
- हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र, संघाच्या प्रतिक्रियेवरून वेगळाच narrative set करायचा मराठी माध्यमांचा प्रयत्न!!