• Download App
    खोटे बोलून राज ठाकरेंनी औरंगाबादच्या इतिहासाचा खून केला - श्रीमंत कोकाटेMNS chief Raj Thakare spread wrong information in society says shirmant kokate

    खोटे बोलून राज ठाकरेंनी औरंगाबादच्या इतिहासाचा खून केला – श्रीमंत कोकाटे

    छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली याचा शोध महात्मा फुले यांनी घेतला. टिळकांनी शिव समाधीचा एक दगड ही बसवला नसून त्यांनी शिवस्मारकासाठी गोळा केलेला निधी त्यांनी हडप केला.तरीसुद्धा ठाकरे हे टिळकांनी समाधी बांधली असे खोटे सांगत आहे. इतिहासाची मोडतोड करणाऱ्या ठाकरेंना इतिहास माफ करणार नाही. खोटे बोलून राज ठाकरेंनी औरंगाबादच्या इतिहासाचा खून केला असे मत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. MNS chief Raj Thakare spread wrong information in society says shirmant kokate


    विशेष प्रतिनिधी

    पुणे -छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली याचा शोध महात्मा फुले यांनी घेतला. टिळकांनी शिव समाधीचा एक दगड ही बसवला नसून त्यांनी शिवस्मारकासाठी गोळा केलेला निधी त्यांनी हडप केला.तरीसुद्धा ठाकरे हे टिळकांनी समाधी बांधली असे खोटे सांगत आहे. इतिहासाची मोडतोड करणाऱ्या ठाकरेंना इतिहास माफ करणार नाही. खोटे बोलून राज ठाकरेंनी औरंगाबादच्या इतिहासाचा खून केला असे मत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.

    कोकाटे म्हणाले,लेखक जेम्स लेन याचा पुस्तकाची पार्श्वभूमी पुरंदरे यांनी केली. लेनचा सह श्रीकांत बहुलकर यांना शिवसैनिकांनी काळे फासल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांची माफी मागितली. बाबासाहेब पुरंदरे हे विकृतीचा परिपाक होते. त्यांनी शिव चारित्रा बाबत जे विकृत लेखन केले त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. पुरंदरे यांच्या जन्मापूर्वी ४० वर्ष अगोदर महात्मा फुले रायगडवर गेले. त्यांनी शिव समाधीचा शोध घेतला आणि शिवजयतीला सुरुवात केली. त्यांनी ९०८ ओळींचा शिव पोवाडा रचला आणि गायला.अशाप्रकारे पुरंदरे यांनी पोवाडा रचला नाही की गायला नाही. शिवजयंतीचा वाद निर्माण करण्याचे पातक पुरंदरेंनी केलेले आहे. शिवकालीन लढाई ही राजकीय होती परंतु पुरंदरे यांनी शिवचरित्राची मांडणी दोन धर्मात द्वेषाला खतपाणी घालणारी केली.

    राज ठाकरे हे शिवप्रेमींच्या बाजूने नाही तर लेन वाद्यांच्या बाजूने उभे राहिले आहे.राज ठाकरे हे उत्तम वक्ते असताना ही ते राजकीय जीवनात यशस्वी झालेले नाही. १३ आमदारावरून त्यांची घसरण एक आमदार इतकी झाली असून त्याला अनेक कारणे आहे. ठाकरे हे पुरंदरे यांचे जितके उद्दतिकरण करतील तितके ते तोंडवर आपटतील. आघाडी सरकारने पुरंदरे यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्यावा. केवळ राजकीय फायद्यासाठी वापर करू नका असे मत यावेळी कोकाटे यांनी व्यक्त केले.

    MNS chief Raj Thakare spread wrong information in society says shirmant kokate

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!