वृत्तसंस्था
पुणे : मंदिरातील ‘देव बोले, उघडा दार उद्धवा आता उघडा दार उद्धवा’, ‘मोर्चे चालू यात्रा चालू मग मंदिर बंद का ?’,’ उद्धवा अजब तुझे सरकार…!’, ‘आई राजा उदो उदो बिघाडी सरकारला उठव…’,असे फलक हातात धरून मनसेने राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन केले. MNS agitation in Pune to open temples
वाढत्या कोरोना रुग्णाची संख्या आणि केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्यात मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसापूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कसबा गणपती मंदिरासमोर याच मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.त्या पाठोपाठ ग्रामदैवता तांबडी जोगेश्वरी मंदिराबाहेर मनसेने घंटानाद आणि आरती करून आंदोलन केले.
राज्य सरकारने लवकरात लवकर मंदिरं खुली न केल्यास मनसेच मंदिरं उघडेल, असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांनी सरकारला इशारा दिला. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे म्हणाले की, राज्यात सर्व व्यवहार सुरू आहेत. पण, राज्यातील मंदिरे बंद आहेत. त्यावर अवलंबून मंडळीचा व्यवसाय ठप्प आहे. तसेच त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. याबाबतचा विचार सरकारने लवकर करावा. आज घंटानाद आंदोलन केले. सरकारने मंदिरं भाविकांसाठी लवकर खुली करावी अन्यथा आम्हीच मंदिरं खुली करू, असा इशारा त्यांनी दिला.
MNS agitation in Pune to open temples
महत्त्वाच्या बातम्या
- GST Collection In August : जीएसटी संकलनात ३०% ची मोठी वाढ, २ दिवसांत अर्थव्यवस्थेसाठी ४ आनंदाच्या बातम्या
- तालिबानकडून सुशिक्षित मुलींचा घरोघरी शोध; अमेरिकेचे एजंट असल्याचा आरोप, बलात्कार आणि हत्येची धमकी
- मोदींच्या GDP तील वाढ म्हणजे Gas, Diesel, Petrol ची दरवाढ; २३ लाख कोटी रूपये गेले कुठे? राहुल गांधींची सरकारवर टीका