प्रतिनिधी
मुंबई : भाजप खासदार ब्रजभूषण सिंहांविरोधात दादर पोलीस स्थानकात मनसेने तक्रार दाखल केली आहे. उत्तर प्रदेशचे भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या विरोधात महाराष्ट्र सैनिक आक्रमक झाले आहेत. mns aggression against Brajbhushan Singhs; Filed a complaint at Dadar police station
मनसेने दाखल केली तक्रार!
ब्रजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या बद्दल खालच्या भाषेत केलेल्या वक्तव्यावरून मनसेने ही तक्रार दाखल केली आहे. दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण करणे आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत ही तक्रार देण्यात आली आहे. यावेळी मनसेचे जनहित कक्षाचे वकील अँड गजणे, अँड रवी पाष्टे, उपविभाग अध्यक्ष शशांक नागवेकर आदी पोलीस ठाण्यात उपस्थित होते. हा गुन्हा नोंद झाल्यास ब्रजभूषण सिंह यांच्यावरील हा महाराष्ट्रातील पहिला गुन्हा ठरेल.
मी राज ठाकरेंना २००८ पासून शोधतोय. जर ते कधी मला एअरपोर्टवर किंवा अन्यत्र कुठे भेटले, तर मी नक्कीच त्यांना हिसका दाखवीन, असे ब्रजभूषण म्हणाले. तसेच उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाबद्दल जोपर्यंत ते माफी मागणार नाही, तोवर त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशाराही ब्रजभूषण यांनी दिला आहे.
mns aggression against Brajbhushan Singhs; Filed a complaint at Dadar police station
महत्वाच्या बातम्या