• Download App
    राष्ट्रवादी यांच्यातला वाद पेटलेलाच; पडळकर समर्थकांची राष्ट्रवादीच्या सोलापूरातील कार्यालयावर तुफान दगडफेक|MLC gopichand padalkar supporters stoned NCP office in solapur

    पडळकर – राष्ट्रवादी यांच्यातला वाद पेटलेलाच; पडळकर समर्थकांची राष्ट्रवादीच्या सोलापूरातील कार्यालयावर तुफान दगडफेक

    प्रतिनिधी

    सोलापूर :  भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी यांच्यातला वाद आणखी जोरात पेटलेला दिसत आहे. पडळकरांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना साडेतीन जिल्ह्यांचे नेते म्हटल्यावर चिडलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करून तो पळून गेल्याचा विडिओ व्हायरल झाला.MLC gopichand padalkar supporters stoned NCP office in solapur

    अमित सुरवसे असे त्याचे नाव असल्याचे सोशल मीडियावर फिरत आहे. पोलीसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पडळकर यांच्या गाडीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने दगडफेक केल्यानंतर त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत.



     

    आता गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी आज सोलापूरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली. एकच छंद, गोपीचंद अशा घोषणा देत, पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केली.

    या दगडफेकीच्या घटनेनंतर आता आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह १० ते १५ ते जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र, याबाबत पडळकर यांनी प्रतिप्रश्न करताना पुणे आणि पंढरपुरात हजारोंची गर्दी करणारे अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पडळकर यांनी केली आहे.

    याबाबत विचारले असता कायदा हातात घेण्याचे कारण नाही. ज्यांनी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. ते नाशिकमध्ये खरीप हंगामाच्या आढावा बैठकीसाठी आले होते. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.

    MLC gopichand padalkar supporters stoned NCP office in solapur

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ