प्रतिनिधी
जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदार – खासदारांनी राजीनामे देऊ नयेत अन्यथा ते रिकामे बसतील. आम्ही रिकामे, तेही रिकामे अशी अवस्था येईल. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी आवाज उठवण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी त्यांनी राजीनामे देऊ नयेत, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेत दिला.MLAs – MPs should not resign, otherwise they will sit vacant; Warning of Jarange Patal!!
मराठा आंदोलन हिंसक वळणावर गेले. बीड धाराशिव मध्ये तसेच मराठवाड्यातल्या अनेक शहरांमध्ये जाळपोळी झाल्या. आमदार – खासदारांची घरे जाळली गेली. त्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारने समाजकंटकांवर कायद्याचा बडगा उगारला. छत्रपती संभाजी नगर मध्ये 30 गुन्हे दाखल झाले अन्यत्र देखील गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. अनेक समाजकंटक आयडेंटिफाय झाले आहेत त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांची फोनवरून चर्चा केली त्यावेळी मनोज जरांगे पाटलांनी त्यांना अर्धवट आरक्षण नको अशी भूमिका मांडली. 60 % मराठा समाज आधीच ओबीसी समाजातून आरक्षण घेतो आहे. त्यामुळे उरलेला समाज आरक्षणाच्या कक्षेत येऊ द्या. एकदम 5 कोटी मराठा समाज त्यांच्यात येईल, असे समजण्याचे कारण नाही. ज्यांना आरक्षण घ्यायचे त्यांनी घ्यावे यांना घ्यायचे नाही त्यांनी घेऊ नये. त्यासाठी ते स्वतंत्र आहेत, असे जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन नव्याने आपली भूमिका मांडली. त्यावेळी त्यांनी आमदार खासदारांनी राजीनामे देऊ नयेत अन्यथा अमेरिका मी बसलो तसे तेही रिकामे बसतील आणि मराठा आरक्षणासाठी आवाज उठवायला कोणी राहणार नाही. त्यामुळे आमदार – खासदारांनी मुंबईत राहावे. सरकारवर विशेष अधिवेशनासाठी दबाव आणावा आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा, असे आवाहन केले.
राजीनामा सत्राची धास्ती
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, आमदार पवार आदींनी राजीनामे दिले. त्यानंतर राजीनामा सत्र मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. वेगवेगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. गाव पातळीवर सरपंच उपसरपंचांनी राजीनामे दिले. त्यामुळे मराठा लोकप्रतिनिधींची संख्या झपाट्याने कमी व्हायला लागली. या पार्श्वभूमीवर हे राजीनामा सत्र असेच सुरू राहिले तर राजकीय दृष्ट्या मोठ्या अडचणी तयार होतील. मराठा समाज सत्तेच्या कक्षेबाहेर जाईल, हे लक्षात घेऊन मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या आवाहनाला विशेष महत्त्व आहे.
MLAs – MPs should not resign, otherwise they will sit vacant; Warning of Jarange Patal!!
महत्वाच्या बातम्या
- नारायण मूर्ती आठवड्यातून 80-90 तास काम करतात; पत्नी सुधा मूर्ती म्हणाल्या- त्यांचा खऱ्या मेहनतीवर विश्वास
- सीआयडीने चंद्राबाबू नायडूंविरुद्ध चौथा गुन्हा दाखल केला; बेकायदेशीर दारू दुकानांना परवाने वितरीत केल्याचा आरोप
- सुप्रीम कोर्टाने मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला; मद्य घोटाळ्यात 383 कोटींचे व्यवहार, 8 महिन्यांत तपास पूर्ण करण्याचे आदेश
- Maratha Reservation News : जाळपोळ करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा; मुख्यमंत्र्यांची जरांगेंशी फोनवरून चर्चा जरांगे आजपासून पाणी पिणार!!