विशेष प्रतिनिधी
विटा : खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांनी विटा येथे टेंभू योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. तर आता त्यांचा 7 जानेवारी रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने 6 जानेवारी ते 9 जानेवारी या कालावधीत कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. याची माहिती अनिल बाबर सन्मान सोहळा समितीने दिली आहे.
MLA’s Birthday : Farmers in Vita will get to experience helicopter ride
या कृषी प्रदर्शनामध्ये अवजारे, मशिनरी, सिंचन साधने, कृषी निविष्ठा, कृषी तंत्रज्ञान, सौरऊर्जा, ग्रीन हाऊस स्वयंचलित संसाधने, गृहोपयोगी वस्तूंचा समावेश असणार आहे. एकूण 200 पेक्षा अधिक स्टॉल आणि विविध जातींची जनावरे देखील या कृषी प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहेत.
हे सर्व जरी असले तर सर्वांत महत्त्वाचा आणि आकर्षणाचा मुद्दा हा आहे की या प्रदर्शनामध्ये शेतकर्यांना हेलिकॉप्टरची हवाई सफर अत्यंत कमी सवलतीच्या दरामध्ये घडवून आणण्यात येणार आहे. त्यामुळे हे कृषी प्रदर्शन अत्यंत लक्षवेधी ठरणार आहे. असे अनिल बाबर सन्मान सोहळा समितीने सांगितले आहे.
MLA’s Birthday : Farmers in Vita will get to experience helicopter ride
महत्त्वाच्या बातम्या
- पीएम किसानचा १० वा हप्ता जारी : पीएम मोदींनी १०.०९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले २०,९४६ कोटी रुपये, तुमच्या खात्यात आले की नाही असे तपासा
- UP Elections : निवडणुकीपूर्वी अखिलेश यादवांची मोठी घोषणा, सत्तेत आल्यास ३०० युनिट वीज मिळणार मोफत
- मोठी बातमी : महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, ठाकरे सरकारमधील मंत्री म्हणतात मुख्यमंत्री घेणार निर्णय!
- IMA, IIT दिल्ली आणि जामिया मिलियासह 6000 संस्थांचा FCRA परवाना कालबाह्य, परदेशी देणग्यांचा मार्ग बंद