• Download App
    Ravi Rana आमदार रवी राणांचा मोठा दावा- पुढील मकर

    Ravi Rana : आमदार रवी राणांचा मोठा दावा- पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र येणार

    Ravi Rana

    विशेष प्रतिनिधी

    अमरावती : Ravi Rana  पुढच्या मकर संक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसतील, असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केले आहे. रवी राणा यांच्या या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राज्याच्या परिवर्तनामध्ये उद्धव ठाकरेंनी तिळगूळ खा आणि गोड गोड बोलावे अशी विनंती आहे, असेही रवी राणा यांनी म्हटले.Ravi Rana

    राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि ठाकरे गटाची जवळीक वाढत असल्याचे दिसून येत आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तर आदित्य ठाकरे हे देखील आतापर्यंत तीन वेळा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेले होते. शिवाय ठाकरे गटाच्या ‘सामना’मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले. तसेच उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, असे विधान फडणवीसांनी केले होते. या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना रवी राण यांनी उपरोक्त मोठा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.



    काय म्हणाले रवी राणा?

    राज्याच्या परिवर्तनामध्ये उद्धव ठाकरेंनी तिळगूळ खावे आणि गोड गोड बोलावे अशी विनंती असल्याचे रवी राणा म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना भेटून उद्धव ठाकरे एक पाऊल पुढे आले आहेत असे म्हणत पुढच्या मकरसंक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांसोबत दिसतील, असा दावा रवी राणा यांनी केला. मोदींचे नेतृत्व उद्धव ठाकरेंनी खुल्या मनाने स्वीकारले तर नक्कीच हे होईल, असा विश्वासही राणा यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जाणार आहे. त्यांच्यात नेतृत्वात आगामी महापालिका निवडणुकीत भाजपा- युवा स्वाभिमान पक्ष रिंगणात उतरेल. कुठल्याही निवडणुकीत आम्ही एकत्रित राहू असेही आमदार रवी राणा यांनी सांगितले.

    विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन

    राजकारणात लोकांनी दिलेला निर्णय स्वीकारला पाहिजे. अचलपूरमधून प्रवीण तायडे सक्षम आमदार निवडले आहे. प्रवीण तायडे मतदारसंघात जी काही विकासकामे करतील त्यांना बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला पाहिजे, अशी आशा रवी राणा यांनी व्यक्त केली. लोकशाहीत पराभव झाल्यानंतर तो स्वीकारून सगळ्यांनी अमरावतीच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे. विरोधकांनी तिळगूळ खावे आणि गोड गोड बोलावे, विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहनही रवी राणा यांनी स्थानिक राजकीय नेत्यांना केले आहे.

    राजकारणात आज शत्रू असणारा उद्या मित्र होतो!

    मागील अनेक दिवसांच्या घडामोडी पाहता उद्धव ठाकरेंची भूमिका बदलतीये का असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत अमृता फडणवीस यांनीही भाष्य केले. नेत्यांमध्ये असणारे मतभेद हे विचारधारांबाबत आहेत. त्यांच्या वैयक्तिक पातळीवर ते मतभेद नाहीत. वैचारिक मतभेद असल्याने राजकारणात एकेकाळचा शत्रू असणारा हा मित्र होतो, मग परत शत्रू होतो, परत मित्र होतो अशी कितीतरी उदाहरणे आहेत, असे सूचक विधान अमृता फडणवीस यांनी केले होते.

    MLA Ravi Rana’s big claim – Thackeray-Fadnavis will come together by the next Makar Sankranti

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल