रुग्णांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असते मात्र गरजू आणि गरीब रुग्णांवर धर्मादाय कोट्यातून उपचार करण्यास नामांकित रुग्णालये टाळाटाळ करत आहेत, त्यातूनच पुण्यातील सह्याद्री रुग्णालयाने रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचे काम करत आहे. माळशिरस मतदारसंघातील एका गरीब रुग्णाचा रुग्णालयाने उपचार न केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करत सदर रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडत केली.MLA Ram Satpute alleges Sahyadri Hospital in Pune is playing with patients’ lives by evading treatment from charity quota
विशेष प्रतिनिधी
पुणे : रुग्णांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असते मात्र गरजू आणि गरीब रुग्णांवर धर्मादाय कोट्यातून उपचार करण्यास नामांकित रुग्णालये टाळाटाळ करत आहेत, त्यातूनच पुण्यातील सह्याद्री रुग्णालयाने रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचे काम करत आहे. माळशिरस मतदारसंघातील एका गरीब रुग्णाचा रुग्णालयाने उपचार न केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करत सदर रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडत केली.
अनेक गरजू रुग्ण अपेक्षेने येत असतात, आर्थिक परिस्थिती नसल्याने महागडे उपचार दुसरीकडे शक्य नसतात मात्र रुबी, संचेती, दीनानाथ अशा नामवंत रुग्णालयात धर्मादाय कोट्यातून गोरगरिबांचे उपचार होत नाहीत, रुग्णालये कोणालाही जुमानत नाहीत, जर गरिब गरजू रुग्णांचे उपचारच करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई होणार नाही तर आम्ही सभागृहात बसायचे कशाला? असा सवाल करत आमदार राम सातपुते यांनी सभागृहात रौद्रावतार धारण केला.
सह्याद्री रुग्णालयाच्या संदर्भात सहा महिन्यांपूर्वी आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केली आहे, मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचेही सभागृहात सांगितले. अशा नामवंत रुग्णालयांमध्ये एजंटचा सुळसुळाट झाला असल्याचा आरोप करत तातडीने आरोग्यमंत्री, धर्मादाय आयुक्त आणि आरोग्य सचिवांसोबत बैठक घेण्याची मागणी आमदार सातपुते यांनी केली.
राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी पुण्यातील सह्याद्री रुग्णालयाच्या संदर्भात स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करून आणि पुणे धर्मादाय आयुक्तांच्या मार्फत चौकशी सुरू आहे, येत्या महिन्याभरात चौकशी पूर्ण करून तातडीने कारवाई करणार असल्याची माहिती सभागृहात दिली.
MLA Ram Satpute alleges Sahyadri Hospital in Pune is playing with patients’ lives by evading treatment from charity quota
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : भारताची ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी, सॉफ्टवेअरने वाढवली रेंज
- विकिलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांजे यांचे लंडनच्या तुरुंगात शुभमंगल, स्टेला मॉरिसशी केला विवाह
- काश्मीर पश्नात तोंड घालणाऱ्या चीनला भारताने फटकारले, आमच्या अंतर्गत गोष्टीत लक्ष घालण्याची आवश्यकता नसल्याचे बजावले