• Download App
    दाऊदसारख्या देशद्रोह्यासोबत संबंध असणाऱ्या नवाब मलिक यांना भर चौकात फाशी द्यावी, आमदार महेश लांडगे यांची मागणी|MLA Mahesh Landage demands that Nawab Malik, who has links with traitors like Dawood, should be hanged in Chowk.

    दाऊदसारख्या देशद्रोह्यासोबत संबंध असणाऱ्या नवाब मलिक यांना भर चौकात फाशी द्यावी, आमदार महेश लांडगे यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : महाविकास आघाडी सरकारमधील कोणत्या ना कोणत्या मंत्र्यांवर दररोज भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. मात्र अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांच्यावरील आरोप कोणीही भारतीय खपवून घेणार नाही. दाऊदसारख्या देशद्रोही व्यक्तीशी संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.MLA Mahesh Landage demands that Nawab Malik, who has links with traitors like Dawood, should be hanged in Chowk.

    अशा मंत्र्याला नुसते अटक करून चालणार नाही तर भर चौकात फाशी दिली पाहिजे, अशी मागणी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.लांडगे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार जातीवादाचे आणि धर्माचे राजकारण करत आहे. नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे नेते बाहेर पडत आहेत,



    माझा प्रश्न आहे की ते ज्यांना पाठिंबा देत आहेत ते भारत सोडून पळून गेले आहे. तुम्हाला विचारून तो पळाला का? दाऊदला पळून जाण्यात मदत केली का? त्यामुळेच नवाब मलिकांसारख्या देशद्रोह्याला भारतातील कोणताही नागरिक माफ करणार नाही, त्यांचा राजीनामा सरकार स्वीकारो अथवा न स्वीकारो, पण त्यांना कोणीही माफ करणार नाही.

    माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी सांगितले की, महाराष्ट्र सरकारने मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा स्वीकारला नाही, तर भाजप त्याचा निषेध करेल आणि हे सरकार दहशतवादी गुन्हेगारांशी संबंध ठेवणाºयांचा पदार्फाश करेल.

    MLA Mahesh Landage demands that Nawab Malik, who has links with traitors like Dawood, should be hanged in Chowk.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा