• Download App
    महाराष्ट्रात परिचारिकांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद; पण प्रशिक्षणार्थींवर कामाचा भार Mixed response to strike of nurses in Maharashtra; But the workload on the trainees

    महाराष्ट्रात परिचारिकांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद; पण प्रशिक्षणार्थींवर कामाचा भार

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालये आणि दवाखान्यातील परिचारिकांनी शनिवारपासून बेमुदत संपाला सुरुवात केली आहे. या संपाचा रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होऊ नये म्हणून शिकाऊ परिचारिका आणि डॉक्टर्स यांच्या मदतीने काम सुरळीत पार पाडले जात असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाने दिली आहे. Mixed response to strike of nurses in Maharashtra; But the workload on the trainees

    शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

    मुंबईत जे.जे. रुग्णालयात दैनंदिन 100 शस्त्रक्रियांपैकी केवळ 23 अत्यावश्यक शस्त्रक्रिया संध्याकाळपर्यंत करण्यात आल्या आहेत. जे.जे. रुग्णालयाशी संलग्न जी.टी. आणि सेंट जॉर्जेस रुग्णालयात अंदाजे 30 ते 40 शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचे पहायला मिळत आहे.

    रुग्णालय प्रशासनाची माहिती

    जे.जे. रुग्णालयातून 765, सेंट जॉर्जेसमधील 141 तर जी.टी. रुग्णालयातील 146 परिचारिकांनी संपात सहभाग नोंदवला आहे. तत्कालीन शस्त्रक्रिया रुग्णालयात पार पाडल्या जात आहेत. उर्वरित शस्त्रक्रिया किमान पाच दिवसांसाठी पुढे ढकलल्या जात असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

    Mixed response to strike of nurses in Maharashtra; But the workload on the trainees

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sharad Pawar : पंढरपूरच्या शेतकऱ्याची शेती क्रांती, 3 किलोच्या आंब्याला शरद पवारांचे नाव!!

    Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पाकवर कडक कारवाई करणारे मोदी पहिले पंतप्रधान!

    Prakash Ambedkar भाजप पासून सावध राहायचा शिंदे + अजितदादांना प्रकाश आंबेडकरांचा सल्ला; पण खुद्द त्यांच्या वंचित आघाडीची अवस्था काय??