विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mitkari सोलापूरमध्ये करमाळ्याच्या महिला आयपीएस अधिकारी डीएसपी अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फोन आणि व्हिडिओ कॉलवरून जोरदार वाद झाला. प्रत्यक्षात, डीएसपी अंजली कृष्णा रस्ते बांधकामासाठी बेकायदेशीर वाळू उत्खननाच्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी माढा तालुक्यातील कुर्डू गावात पोहोचल्या होत्या. गावकरी आणि घटनास्थळी असलेल्या अधिकाऱ्यामध्ये वाद झाला. या वादातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट अजित पवारांना कॉल लावला होता. त्यानंतर अजित पवारांनी या महिला अधिकाऱ्याला दम भरल्याचे समोर आले.Mitkari
या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात चर्चा होण्यास तसेच अजित पवारांवर टीका होण्यास सुरू झाले आहे. अजित पवारांचा पुतण्या व शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सातत्याने अजित पवारांवर टीका करत असतात, परंतु अशा वेळी मात्र रोहित पवारांनी अजित पवारांची पाठराखण केली असल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मात्र कोर्टात खेचण्याची भाषा केली आहे.Mitkari
अजित पवारांच्या पक्षातील आमदार अमोल मिटकरी यांनी पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी केली आहे. यावर टीका करताना अंजली दमानिया म्हणाल्या, अमोल मिटकरींनी त्यांच्या बॉसच्या सांगण्यावरून हे पत्र लिहिले की स्वतःचे डोके वापरले? अंजना कृष्णा यांची चौकशी? का? तुमच्या कार्यकर्त्यांच्या बेकायदेशीर उत्खननावर कारवाई केली म्हणून? असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे.
तुम्हाला कोर्टात खेचेन- अंजली दमानिया
पुढे अंजली दमानिया म्हणतात, चौकशी त्या अजित पवारची झाली पाहिजे. ज्या कंपन्या अजित पवारच्या कब्ज्यात आहेत त्याच्या चौकश्या झाल्या पाहिजेत, ज्या कंपन्यांमध्ये सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार, जगदीश कदम, राजेंद्र घाडगे, अमोल मिटकरी असतील, त्यांच्या चौकश्या झाल्या पाहिजेत. त्या आयपीएस अधिकाऱ्याला जरा पण छळण्याचा प्रयत्न तुम्ही करूनच दाखवा, तुम्हाला कोर्टात खेचेन. आयपीएस ऑफिसर्सच्या बूट पुसण्याची लायकी नसते ह्या राजकारण्यांची. दुर्दैव हे आहे की सत्ता अशाच लोकांच्या हातात आहे.
आयपीएस बनताना देशासाठी काहीतरी करू ही भावना असते. अंजना कृष्णा यांना वाटले मी हे सगळे अवैध काम, गुंडगिरी बंद करेन. तिला कुठे माहिती की या गुंडांना वर बसलेला एक बाप असतो आणि जर कोणी त्यांचे काम थांबवले तर अशा प्रत्येकाला टार्गेट केले जाते. याच कारणांमुळे आपल्या तहसीलदार, कलेक्टर, एसपी यांच्यात हिंमत राहत नाही यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची, असे अंजली दमानिया म्हणाल्या.
खऱ्याला खरे म्हणण्याचा माझा स्वभाव – रोहित पवार
रोहित पवार म्हणाले, राज्यात शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसाने झालेले नुकसान असे अनेक प्रश्न आहेत पण त्यावर चर्चा होण्याऐवजी सध्या करमाळा येथील महिला पोलिस अधिकारी आणि मा. अजितदादा यांच्यातील संभाषणाचीच अधिक चर्चा होताना दिसते. वास्तविक अजितदादा सहज बोलले तरी ते रागावले, संतापले असे त्यांना भेटणाऱ्या नवख्या माणसाला वाटते. पण अजितदादांची कार्यपद्धती, स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा गेली 35-40 वर्षे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, करमाळा प्रकरणात संबंधित महिला अधिकाऱ्याचीही कोणतीही चूक नाही. पण अजितदादांच्या फोन कॉलमधील संभाषणाला जाणीवपूर्वक वेगळे वळण देऊन मित्रपक्षांकडूनच टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते. आम्ही विरोधात असलो तरी माझा स्वभाव हा कायम खऱ्याला खरे म्हणण्याचा आहे, त्यामुळे आपल्याच मित्रांकडून कसा सापळा रचला जातो, हेही अजितदादांनी यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे. आम्ही मात्र नको त्या वादात तेल न घालता खऱ्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधत राहू, असे ते म्हणालेत.
परिस्थिती अधिक बिघडू नये हाच उद्देश होता – सुनील तटकरे
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांनी देखील अजित पवारांची बाजू घेतली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नेहमीच कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच आपल्या पोलिस दलाचा, विशेषतः शौर्य आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचा मनःपूर्वक सन्मान जपला आहे. सोलापूरमधील अलीकडील घटनेचे जाणीवपूर्वक संदर्भहीन आणि दिशाभूल करणारे चित्रण केले जात आहे. प्रत्यक्षात, घटनास्थळी शांतता राखली जावी व परिस्थिती अधिक बिघडू नये, हा प्रामाणिक आणि स्पष्ट हेतूच मा. अजितदादांचा होता, याची सर्वांनी जाण ठेवावी, असे तटकरे यांनी म्हटले आहे.
अजित पवारांचे स्पष्टीकरण
अजित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, सोलापूर जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलिस दलाबद्दल तसेच धैर्याने आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचे राज्य हेच सर्वात महत्त्वाचे आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे पवारांनी म्हटले आहे.
Mitkari Demands Inquiry Anjali Krishna, Damaniya Warns Court Action
महत्वाच्या बातम्या
-
- Ajit Pawar : महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर; माझ्यासाठी कायद्याचे राज्य महत्त्वाचे, अजितदादांची महिला IPS वादावर स्पष्टोक्ती
- Howard Lutnick अमेरिकेला एक ट्रम्प नाही पुरला म्हणून दुसरा पुढे आला; भारत अमेरिकेला sorry म्हणेल, असा दावा केला!!
- West Bengal : पश्चिम बंगाल विधानसभेत गदारोळ, भाजपचे मुख्य प्रतोद निलंबित; बाहेर जाण्यास नकार दिल्यावर मार्शलनी जबरदस्तीने काढले
- CM Siddaramaiah : CM सिद्धरामय्या यांचा राष्ट्रपतींना प्रश्न- तुम्हाला कन्नड येते का? भाजपचा पलटवार- सोनियांना विचारण्याची हिंमत आहे का?