• Download App
    13, 14 ऑगस्टला पुण्यात रंगणार मिती शॉर्ट फिल्म फेस्टिवल Miti Short Film Festival to be in Pune

    13, 14 ऑगस्टला पुण्यात रंगणार मिती शॉर्ट फिल्म फेस्टिवल

    वृत्तसंस्था

    पुणे : मिती फिल्म सोसायटीतर्फे दर वर्षी घेण्यात येणारा मिती शॉर्ट फिल्म फेस्टिवल यंदा 13 व 14 ऑगस्ट रोजी BNCA ऑडिटोरियम, कर्वे स्त्री शिक्षण संस्था येथे आयोजित करण्यात आला आहे. मिती फिल्म सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद लेले यांनी ही माहिती दिली. मिती शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे हे दुसरे वर्ष आहे. हा फेस्टिवल सर्वांसाठी खुला असून प्रेक्षकांना सर्व शॉर्ट फिल्मस् विनामूल्य पाहता येतील असे लेले यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र नॅचलर गॅस लिमिटेड (एमएनजीएल) या फेस्टिवलचे मुख्य प्रायोजक आहेत. तर बँक ऑफ महाराष्ट्र हे सहयोगी प्रायोजक आहेत. Miti Short Film Festival to be in Pune

    विख्यात नाट्य-चित्रपट अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांच्या हस्ते दि. 13 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजता फेस्टिवलचे उद्घाटन होणार आहे. यावेळी, एमएनजीएलचे मॅनेजिंग डायरेक्टर दीपक सावंत, डायरेक्टर कमर्शियल संजय शर्मा, इंडिपेंडंट डायरेक्टर बागेश्री मंठाळकर व महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दोन दिवस विविध सत्रांमध्ये शॉर्ट फिल्मस् चा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.

    दि. 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी होणाऱ्या मुख्य पारितोषिक वितरण समारंभाला हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील तसेच मालिका विश्वातील विख्यात अभिनेते नितीश भारद्वाज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, एमएनजीएलचे मॅनेजिंग डायरेक्टर दीपक सावंत, डायरेक्टर कमर्शियल संजय शर्मा हे देखील या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

    शॉर्ट फिल्ममेकर्ससाठी विशेष सत्रांचे आयोजन –

    दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शॉर्ट फिल्ममेकर्ससाठी मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन या फेस्टिवलमध्ये करण्यात आले आहे. ‘Short Films: Marketing and Opportunities’ या विषयावर दि. 13 ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सत्रात तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत एक पॅनल डिस्कशन होणार आहे. त्यामध्ये केशव साठे, मनोज कदम, उषा देशपांडे व मयूर हरदास तज्ज्ञ मार्गदर्शक हे सहभागी होणार आहेत. तसेच दि. 14 ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात ‘दिग्दर्शन’ या विषयावर सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक प्रसाद नामजोशी यांचा मास्टर क्लास होणार आहे. या दोन्ही सत्रांसाठी कोणतेही प्रवेशमूल्य नाही.

    मिती शॉर्ट फिल्म फेस्टिवलसाठी केवळ महाराष्ट्रासह तब्बल १० राज्यांतून व ७ देशांमधून जवळपास शंभरहून अधिक शॉर्ट फिल्मस् आल्या आहेत. यंदाचे वर्ष हे भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे ‘India @75’ या विशेष विषयावरही स्वंतत्रपणे शॉर्ट फिल्मस् मागविण्यात आल्या होत्या. स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा फेस्टिवलच्या अंतिम सत्कार सोहळ्यात करण्यात येणार आहे.

    • माहितीसाठी संपर्क :
    8149211299, 9689888206

    Miti Short Film Festival to be in Pune.

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!