विशेष प्रतिनिधी
जालना : रेल्वे मंत्रालय आता दोन शिफ्टमध्ये काम करणार आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत पहिली शिफ्ट तर संध्याकाळी ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत दुसरी शिफ्ट असणार आहे. Ministry of Railways working now Will do in two shifts : Ravsaheb Danve
या शिफ्टच्या माध्यमातून तक्रारींचं निवारण करणार केले जाईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची फेसबुक पेजवरून माहिती.
रेल्वेचे चालक आणि इतर कर्मचारी २४ तास कार्यरत राहतात. त्यामुळे रेल्वे मंत्रालय देखील दोन शिफ्टमध्ये कार्यरत ठेवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने आज घेतल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली.रेल्वे मंत्रालयातील दोन शिफ्टच्या माध्यमातून तक्रारींचा निपटारा करणार असल्याच देखील दानवे यांनी स्पष्ट केले आहे.
- रेल्वे मंत्रालय आता दोन शिफ्टमध्ये काम करणार
- रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती
- पहिली शिफ्ट सकाळी ७ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत
- दुसरी शिफ्ट संध्याकाळी ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत
- रेल्वेची सेवा २४ तास सुरु असल्यामुळे शिफ्ट
- दोन शिफ्टच्या माध्यमातून तक्रारींचा निपटारा