• Download App
    अमरावती जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत राज्य मंत्री बच्चू कडू विजयी , माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांचा ३ मतांनी पराभवMinister of State Bachchu Kadu wins Amravati District Co-operative Bank election, defeats former president Bablu Deshmukh by 3 votes

    अमरावती जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत राज्य मंत्री बच्चू कडू विजयी , माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांचा ३ मतांनी पराभव

    अटीतटीच्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांचा पराभव केला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांना 22 मते मिळाली तर बबलू देशमुख यांना 19 मते मिळाली आणि बच्चू कडू यांनी तीन मतांनी विजय मिळवला आहे.Minister of State Bachchu Kadu wins Amravati District Co-operative Bank election, defeats former president Bablu Deshmukh by 3 votes


    विशेष प्रतिनिधी

    अमरावती : संपूर्ण राज्याचे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागल होत. दरम्यान सोमवारी ही निवडणूक पार पडली. आज ( मंगळवार ) सकाळी या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तसेच या निवडणुकीचा पहिला निकाल लागला आहे. निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे राज्य मंत्री बच्चू कडू विजयी झाले आहेत.


    लव्ह जिहादला पाठिंबा देणाऱ्या बच्चू कडू यांच्याविरोधात सुवर्णकार समाज आक्रमक, गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आत्मदहनाचा इशारा


    चांदुर बाजार सेवा सहकारी सोसायटीतून परिवर्तनचे राज्यमंत्री राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विजय मिळवला आहे. अटीतटीच्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांचा पराभव केला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांना २२ मते मिळाली तर बबलू देशमुख यांना १९  मते मिळाली.

    बच्चू कडू यांनी तीन मतांनी विजय मिळवला आहे.मागील दहा वर्षापासून बबलू देशमुख यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेची सत्ता होती. परंतु मधल्या काळात या बँकेवर जवळपास चार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप झाला होता. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगली होती.

    Minister of State Bachchu Kadu wins Amravati District Co-operative Bank election, defeats former president Bablu Deshmukh by 3 votes

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!