Free Vaccination in Maharashtra : देशात सध्या कोरोना माहामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच जोडीला देशात लसीकरण मोहीमही सुरू आहे. 1 मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार असून त्याअंतर्गत 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस घेण्याची मुभा देण्यात आली आहे. यापूर्वीच उत्तर प्रदेशातील योगी सरकारने, मध्य प्रदेशातील शिवराज सरकारने व छत्तीसगडमध्ये तेथील मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्वांना मोफत लसीची घोषणा केली. आज महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी राज्यातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळणार असल्याची घोषणा केली आहे. Minister Nawab Malik Declares Free Vaccination in Maharashtra amid Corona Crisis
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशात सध्या कोरोना माहामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच जोडीला देशात लसीकरण मोहीमही सुरू आहे. 1 मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार असून त्याअंतर्गत 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस घेण्याची मुभा देण्यात आली आहे. दुसरीकडे, कोरोनाच्या लस उत्पादक कंपन्यांनी लसीच्या किमत जाहीर केल्या आहेत. कोव्हिशील्ड राज्य सरकारला 400 रुपयांना तर खासगी रुग्णालयांना 600 रुपयां मिळणार आहे. तर भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन राज्य सरकारला 600 रुपयांना, तर खासगी रुग्णालयांना 1200 रुपयांना मिळणार आहे. लसींच्या या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या मनात विविध शंका निर्माण झाल्या आहेत. यामुळे यापूर्वीच उत्तर प्रदेशातील योगी सरकारने, मध्य प्रदेशातील शिवराज सरकारने व छत्तीसगडमध्ये तेथील मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्वांना मोफत लसीची घोषणा केली. यामुळे महाराष्ट्रातही लसीकरण मोफतच करण्याची मागणी जोर धरू लागली होती.
परिणामी, आज महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी राज्यातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळणार असल्याची घोषणा केली आहे. यापूर्वी, काल पुण्यात पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लसीकरणाबाबत मुख्यमंत्री स्वत: एक तारखेला भूमिका जाहीर करतील, अशी माहिती दिली होती. याशिवाय राज्यातील सधन नागरिकांनी लस विकतच घेण्याचे आवाहन करण्यात केले होते.
याशिवाय राज्य सरकार लसीकरणाची गती वाढवण्यासाठी आता जागतिक निविदा काढणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली. या निविदांसाठी पाच सदस्यीय समिती नेमण्यात येणार असून राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे समितीचे अध्यक्ष असतील. एक मे महाराष्ट्र दिनी याबाबत कार्यवाही सुरू होण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली होती.
Minister Nawab Malik Declares Free Vaccination in Maharashtra amid Corona Crisis
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक 1784 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा, इतर राज्यांपेक्षा दुप्पट
- आता दूर होईल ऑक्सिजनचा तुटवडा, देशभरात ५५१ PSA Oxygen Plants ची पंतप्रधान मोदींची घोषणा
- जगात पहिल्यांदा येणार भारताची Nasal Vaccine, कोरोनाला हरवण्यासाठी सर्वात प्रभावी
- शासनाचा पैसा मिळेना, आमदाराने स्वत : ची 90 लाखांची एफडी मोडून रुग्णांसाठी घेतले 5 हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन
- भारताने केलेल्या मदतीचा अमेरिकेला विसर, आता दबावामुळे बायडेन प्रशासनाकडून मदतीचा हात पुढे