विशेष प्रतिनिधी
बीड: केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा गोपीनाथ गडावरून शुभारंभ, भाजप नेत्या पंकजा मुंडे दाखविणार यात्रेला हिरवा झेंडाMinister Bhagwat Karad will get the blessings of Gopinath fort
१६ तारखेला केंद्रीय अर्थ खात्याचे राज्यमंत्री डाॅ भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेला परळीच्या गोपीनाथ गडावरुन सुरुवात होणार आहे. खुद्द पंकजा मुंडे या यात्रेस हिरवा झेंडा दाखविणार आहेत. खरतर मागील काही दिवसांपासून भागवत कराड यांना मंत्रिपद मिळाल्याने, मुंडे समर्थक नाराज होते. त्यामुळे ही यात्रा बीडमध्ये येणार नाही, अशी चर्चा केली जात होती
परंतु आता स्वतः पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत यात्रेस सुरुवात होणार असल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आले आहे. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्यासह खासदार प्रीतम मुंडे देखील उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान त्याच दिवशी अकरा वाजता बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात कार्यशाळेचे देखील आयोजन करण्यात आल्यानं पंकजा मुंडे यांच्या भूमिकेवर लक्ष राहणार आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी मुंडे समर्थकांची नाराजी दूर झाल्याचं म्हटलं असलं तरी या यात्रेत मुंडे समर्थक सामील होतील का.? हे पाहणं गरजेचं असणार आहे.
- दस्तुऱखुद्द नाराज पंकजा मुंडे दाखविणार हिरवा झेंडा
- खासदार प्रीतम मुंडे यांचीही उपस्थिती
- दुखावलेल्या मुंडे समर्थकांकडे लक्ष