विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : विशाळगडावरचे अतिक्रमण काढायला विरोध करत हिंसाचारप्रकरणी आता एमआयएम आक्रमक झाला असून 19 जुलै रोजी राज्यातील एमआयएमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कोल्हापुरात मुस्लिमांचा मोर्चा काढणार आहेत. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी फेसबुकवरून कार्यकर्त्यांना चिथावणी दिली. MIM will hold a Muslim march in Kolhapur in the Vishalgarh case
दरम्यान सोमवारी इम्तियाज जलील यांनी विशाळगड हिंसाचारप्रकरणी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता. शाहू महाराजांचे वंशज हिंसेचा नेतृत्व करतात असं म्हणत खासदार शाहू छत्रपती आणि संभाजीराजे
यांच्यावर जोरदार टीका केली.
येत्या 19 जुलैला कोल्हापुरात मोर्चा
विशाळगड हिंसाचारप्रकरणी एमआयएम पक्ष आक्रमक झाला असून येत्या 19 जुलैला कोल्हापुरात धार्मिक स्थळी झालेल्या तोडफोडीच्या विरोधात एमआयएमचे राज्यातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी कोल्हापुरात मोर्चा काढणार असल्याचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी फेसबुकवर लिहिले.
विशाळगड प्रकरणावर इम्तियाज जलील म्हणाले..
आम्ही तुम्हाला मतदान केले म्हणून तुम्ही लोकसभेत गेलात. आणि आता मुस्लिम समाजाची अशी परतफेड करत आहात का?? मुस्लिम समाजाच्या घरात घुसून जाळपोळ करण्यात आली. कोण हिंसा करतंय?? शाहू महाराजांचे वंशज हिंसाचाराचे नेतृत्व करतात. आम्ही तुमचा आदर करतो मात्र असल्या हिंसक घटनांना तुम्ही पुढाकार घेता दुर्दैवी आहे, जे पुस्तक महाराज तुम्ही मला दिले ते तुम्ही आता वाचा, आम्ही तुम्हाला मतदान केले म्हणून तुम्ही लोकसभेत गेले, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त केला.
हे घडत असताना कोल्हापूर पोलीस आपली ड्युटी करत नसून बघ्याची भूमिका घेत होते असा आरोप त्यांनी केला. अतिक्रमण काढण्याचे काही नियम असतात, पण हा गुंडाराज चालला आहे का??, असा खडा सवाल त्यांनी केला.
मी कोल्हापुरातील मौलाना, धार्मिक संघटनांना प्रश्न विचारतो. ते सेक्युलर पक्षांना मतदान करायचं म्हणून रस्त्यावर आले होते. मुस्लिमांनी दोन-दोन तास ऊन्हात उभं राहून ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान केले, असे इम्तियाज जलील यांनी संभाजीराजेंना सुनावले.
मी संभाजी महाराजांना मी एक प्रश्न विचारतो की, तुम्ही मला शाहू महाराजांचे पुस्तकं दिले होते. मी आपल्याला होत जोडून विनंती करतो संभाजी महाराज, ते पुस्तक एकदा वाचा. संभाजी महाराज कोण होते?? शाहू महाराज कोण होते?? त्या शाहू महाराजांचे आपण वंशज असाल तर कुठे छत्रपती शाहू महाराज आणि कुठे जाळपोळीचं नेतृत्व करणारे तुम्ही??, असा टोमणा इम्तियाज जलील यांनी संभाजीराजे यांना मारला.
MIM will hold a Muslim march in Kolhapur in the Vishalgarh case
महत्वाच्या बातम्या
- नाव थॉमस मॅथ्यू, वय 20 वर्षे… डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराची ओळख पटली!
- आंध्र प्रदेशचे माजी CM जगन रेड्डी यांच्याविरुद्ध FIR; टीडीपी आमदाराचा खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप
- ओवैसींबरोबर “डबल M” कार्ड खेळायला मनोज जरांगे तयार; पण प्रस्ताव – फ्रस्ताव नाही देणार!!
- तामिळनाडू बसपा प्रमुखाच्या हत्येतील आरोपींचे एन्काउंटर; पोलिसांच्या तावडीतून पळून जाताना ठार