• Download App
    एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील राष्ट्रवादीच्या वाटेवर..? नवाब मलिकांना पर्याय शोधण्यासाठी चाचपणी MIM MP Imtiaz Jaleel is on the way to joining NCP? Hot topic in political circle

    एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील राष्ट्रवादीच्या वाटेवर..? नवाब मलिकांना पर्याय शोधण्यासाठी चाचपणी

    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद, मुंबई : एमआयएमचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. अधिकृतपणे कुणीच दुजोरा देत नाही, पण राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या खासगी चर्चेत जलील यांच्याबद्दल सातत्याने बोलले जात आहे. राष्ट्रवादीने आॅफर दिली आहे, पण ती जलील स्वीकारणार का, असा सवाल राष्ट्रवादीच्या वर्तुळात आहे. MIM MP Imtiaz Jaleel is on the way to joining NCP? Hot topic in political circle

    महाराष्ट्रात भोंगे, अजान, बाबरी मशीद पाडण्याचे श्रेय आदींवरून वातावरण एकदमच घुसळून निघत आहे. त्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या सभेवरून औरंगाबाद चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे आणि जलील तेथील खासदार आहेत. त्यामुळे फोकस आता जलील यांच्या राजकीय चालींवर पडण्यास सुरूवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या राष्ट्रवादीमधील संभाव्य प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाली आहे. जलील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (संपर्क झाल्यास त्यांची भूमिका अपडेट केली जाईल.)

    जलील हे काही पुन्हा एमआयएमच्या ताकतीवर औरंगाबादमधून निवडून येऊ शकत नाही; कारण २०१९मध्ये ते भाजपमधील बंडखोरीमुळे अगदी काठावर विजयी झाले होते. तसेच जर महाविकास आघाडीची निवडणूक पूर्व युती झाल्यास जलील हे आमदार असतानाचा त्यांचा मध्य औरंगाबाद हा विधानसभा मतदारसंघ सुद्धा ते जिंकू शकणार नाहीत. अशा स्थितीत एमआयएममध्ये त्यांना फारसे भविष्य नाही, असे सांगून एक नेता डोळा मिचकावत म्हणाला, “जलील हे महत्वाकांक्षी नेते आहेत. आमदार झाले, खासदार झाले, आता त्यांना मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत. हे फक्त राष्ट्रवादीकडूनच होऊ शकते.”

     

    “जलील हे एमआयएममध्ये असले तरी त्यांची प्रतिमा एमआयएमला साजेशी म्हणजे कडवी- धर्मांध नाही. पूर्वाश्रमीचे पत्रकार असल्याने अभ्यासू पद्धतीने बोलतात. त्यामुळे राष्ट्रवादीलाही त्यांच्यासारख्या अभ्यासू मुस्लिम चेहरयाची गरज आहेच. आतातरी नवाब मलिक बिनखात्याचे मंत्री उरलेत. त्यांच्यावर दाऊदचा हस्तक असा ठप्पा देखील बसला आहे. ते तुरूंगात कधी बाहेर येतील, याची कल्पना नाही. अशास्थितीत जलील हे मलिक यांची जागा घेऊ शकतात,” असे गणित त्या नेत्याने मांडले. सध्या घोडे कोठे अडलेय, हे मात्र सांगण्यास त्याने नकार दिला.

    सध्या राष्ट्रवादीतर्फे मंत्रिमंडळात दोन मुस्लिम चेहरे आहेत. एक हसन मुश्रिफ आणि दुसरे मलिक. मलिक आणि अगदी मुश्रिफ यांच्यामागे भाजप हात धुवून लागला आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांच्या ‘डर्टी डझन’मध्ये मुश्रिफ यांचा वरचा क्रमांक आहे.

    MIM MP Imtiaz Jaleel is on the way to joining NCP? Hot topic in political circle

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!