विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती ‘वर्षा’ बंगल्यावर हा पक्षप्रवेश झाला. मिलिंद देवरा यांच्या जाण्याने दक्षिण मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडले. या पक्षप्रवेशाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक वक्तव्य मोठे चर्चेत आहे. ना सुई, ना टाके; ऑपरेशन सक्सेसफुल मिलिंद देवरांचा प्रवेश फक्त ट्रेलर पिक्चर अभी बाकी है!!, असे एकनाथ शिंदे म्हणाले. Milind Deora joins Shinde’s Shiv Sena
मिलिंद देवरांच्या घराचा काँग्रेससोबतचा 56 वर्षांचा प्रवास त्यांनी थांबवला. त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, काही ऑपरेशन्स अशी करायची, की सुई पण टोचली नाही पाहिजे, कुठे टाकाही लागला नाही पाहिजे. गेल्या 50 वर्षापासून काँग्रेस सोबत आपली नाळ जुडली होती. आपण खासदार आणि मंत्रीही होतात. पण असे काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात. डॉक्टर नसतानाही मी दीड वर्षापूर्वी ऑपरेशन केले. आरोप प्रत्यारोप न करता आपलं काम करत राहायचं. मी, सकाळी उठून रस्ते धुवण्याचे काम करतो. एक, अभ्यासू सयंमी नेता आपल्या मुळे पहिला मिळाला, असे मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल पण म्हणतात. मिलिंद देवरांचा प्रवेश हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है!!, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
मिलिंद देवरा यांचे शिवसेनेत मनापासून स्वागत करतो. ते सपत्नीक आलेत, वहिनींचे देखील स्वागत. कुठलाही निर्णय घेताना यशस्वी पुरुषाच्या मागे महिलेची ताकद असते. आपण निर्णय घेताना ज्या भावना होत्या त्याचा दीड वर्षापूर्वी माझ्या मनात होत्या. मी ज्या वेळेस हा निर्णय घेतला तेव्हा श्रीकांत शिंदे यांच्या आईला विश्वासात घेतल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
मिलिंद देवरा यांची काँग्रेस आणि ठाकरेंवर टीका
काँग्रेस पार्टीच्या सर्वात कठीण काळात मी सोबत होतो. 1968 ची काँग्रेस आणि 2004 च्या काँग्रेसमध्ये फरक आहे. मी 2004 मध्ये मी काँग्रेसमध्ये आलो. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे मेरीट आणि योग्यता यांना महत्व दिलं असतं तर मी आज येथे नसतो. एकनाथ शिंदे यांनाही वेगळा निर्णय घ्यावा असता, असं मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे.
मी काँग्रेस सोडेल असं कधीच वाटलं नव्हते. माझ्या कुटुंबाचे काँग्रेससोबत असलेले 55 वर्षाचे जुने नाते संपवीत आहे. माझे राजकारण हे विकासाचे राजकारण राहिले आहे. माझी विचारधारा सामान्य लोकांची सेवा करणे हीच असल्याचं मिलिंद देवरा म्हणाले.
माजी नगरसेवक सुनील नरसाळे, प्रमोद मांद्रेकर, माजी नगरसेवक रामबच्चन मुरारी, माजी नगरसेविका हंसा मारू, माजी नगरसेविका अनिता यादव, रमेश यादव, प्रकाश राऊत, मारवाडी संमेलन के अध्यक्ष अॅड. सुशील व्यास, पूनम कनौजिया, डायमंड मर्चंटचे संजय शाह, दिलीप साकेरिया, निवृत्त पोलीस अधिकारी हेमंत बावधनकर, वराय मोहम्मद, सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त राजाराम देशमुख, प्रशांत झवेरी, समर्थलाल मेहता, सौरव शेट्टी, अॅड. त्र्यंबक तिवारी, कांती मेहता, उदेश अग्रवाल, प्रवीण अग्रवाल इ. देवरा यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश केला.
Milind Deora joins Shinde’s Shiv Sena
महत्वाच्या बातम्या
- हायकोर्टाने केले स्पष्ट, जरांगेंना रोखणार नाही, कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची
- डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई वाढून 5.69% वर; खाद्यपदार्थांच्या वाढत्या किंमतींमुळे वाढ
- अयोध्येच्या सोहळ्यात 11 कुटुंबांना पूजेचा मान; त्यामध्ये तुळजापूरच्या महादेव गायकवाडांचा सहभाग!!
- राम मंदिराच्या दिव्य स्वप्नपूर्तीसाठी नियतीने मोदींना निवडले… राम मंदिर आंदोलनाचे मूळ शिलेदार अडवाणींच्या भावना