प्रतिनिधी
नाशिक : त्रिपुरातील कथित हिंसाचाराचे भांडवल करत रझा अकादमीने महाराष्ट्रात विविध जिल्ह्यामंध्ये मोर्चे काढून नंतर दंगली घडविल्या. या प्रकरणी रझा अकादमीवर बंदीची मागणी वाढू लागली आहे. याकरता आता पोलिसांवरही दबाव वाढला आहे. त्यामुळे पोलिसांनी मालेगाव तेथील रझा अकादमीच्या कार्यालयावर मंगळवारी मध्यरात्री २.०० ला छापेमारी केली. त्यावेळी पोलिसांनी काही पत्रके आणि कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे समजते.Midnight police raid on Raza Academy office in Malegaon; 4 leaders of Raza Academy still absconding
जिल्ह्याचे पोलिस उपाधीक्षक धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. रात्री २ तास ही छापेमारी सुरु होती. त्यावेळी पोलिसांनी अनेक दस्तऐवज ताब्यात घेतले आहेत. रझा अकादमीने ‘मालेगाव बंद’ ची हाक दिली होती. त्यावेळी मोठा हिंसाचार, दगडफेक आणि जाळपोळ केली होती. तेव्हा पोलिसही जखमी झाले होते.
या प्रकरणी पोलिसांनी ३५ जणांना अटक केली त्यात काही माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. तसेच रझा अकादमीच्या ४ नेत्यांवरही गुन्हे दाखल केले असून ते मात्र सध्या फरार आहेत. सुमारे अडीच हजार दंगलखोरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.
मध्यरात्री शहरातील इस्लामपुरा भागातील रझा अकादमीच्या मुख्य कार्यालयावर छापा टाकून कार्यालयाची तपासणी केली. पोलिसांनी कार्यालयातील विविध दस्तऐवज व कागदपत्र जप्त केले आहे. यात काही आक्षेपार्ह व प्रक्षोभक आहे किंवा काय याची तपासणी सुरु आहे.
चंद्रकांत खांडवी, अपर पोलिस अधीक्षक.
- कागदपत्रे ताब्यात घेतली
रझा अकादमीने मालेगावसह, औरंगाबाद, अमरावती, नांदेड, सातारा या भागात हिंसक आंदोलने केली होती. या प्रकरणी आता रझा अकादमीवर बंदी आणण्याची मागणी जोर धरत आहे. यामुळे पोलिसही आता या हिंसाचारात रझा अकादमीचा सहभाग होता का, याची पडताळणी करत आहेत. त्या अनुषंगानेच मालेगावमधील रझा अकादमीच्या कार्यालयावर छापेमारी केली असल्याचे सूत्रांकडून समजते.
Midnight police raid on Raza Academy office in Malegaon; 4 leaders of Raza Academy still absconding
महत्त्वाच्या बातम्या
- पवार निघाले ममतांच्या पाठोपाठ; दिल्लीत जाऊन काँग्रेस फोडली!!; जी – 23 मधला नेता लावला राष्ट्रवादीच्या गळाला!!
- पूर्वांचल एक्स्प्रेसवर दिसली देशाची एअर पॉवर, पंतप्रधान मोदींची हर्क्युलस विमानातून एक्स्प्रेसवर एंट्री
- काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने दोन व्यापारी आणि दोन दहशतवाद्यांना टिपले
- दहशतवादाचा चिथावणीखोर झाकिर नाईकच्या इस्लामिक रिसर्च’वरील बंदी पुन्हा वाढविली