• Download App
    औद्योगिक पायाभूत सुविधेत महाराष्ट्र देशात पुन्हा आघाडीवर, केंद्राच्या अहवालात निष्कर्ष|MIDC topper in Indian

    औद्योगिक पायाभूत सुविधेत महाराष्ट्र देशात पुन्हा आघाडीवर, केंद्राच्या अहवालात निष्कर्ष

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – एमआयडीसी औद्योगिक पायाभूत सुविधा विकास निर्देशांकात देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. केंद्र सरकारच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अहवालात हा निष्कर्ष नोंदवला गेला आहे. त्यात २७ उद्यानांना लीडर म्हणून घोषित करण्यात आले.MIDC topper in Indian

    डीपीआयआयटीद्वारे प्रसिद्ध औद्योगिक पार्क मूल्यांकन प्रणाली अहवालाची दुसरी आवृत्ती वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी प्रसिद्ध केली. यानुसार ६८ औद्योगिक उद्यानांचे लीडर्स म्हणून मूल्यांकन करण्यात आले आहे,



    त्यापैकी २७ उद्याने महाराष्ट्रातील आहेत. जागतिक दृष्टिकोन स्वीकारून, मार्गदर्शक तत्त्वांच्या निकषांआधारावर, उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाने औद्योगिक स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी आयपीआरएस २.० हा मुख्य उपक्रम सुरू केला आहे.

    एसआयडीसी, केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय विभागांनी दिलेल्या नामांकनांच्या आधारे देशातील ३९९ औद्योगिक उद्याने आणि देशभरातील ५० विशेष आर्थिक क्षेत्रे यांचे मूल्यांकन ४५ मापदंडांच्या आधारे केले गेले.

    महाराष्ट्राने ३० औद्योगिक उद्याने नामांकित केली होती. त्यापैकी २७ उद्यानांना लीडर, तर ३ उद्यानांना चॅलेंजर्स म्हणून दर्जा देण्यात आला. सर्व सहभागी राज्यांपैकी लीडर श्रेणीमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक उद्याने आहेत.

    MIDC topper in Indian

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    एकनाथ शिंदेंनी भाजपच्या धोक्याची घंटा ओळखली, की मराठी माध्यमांनीच लांडगा आला‌ रे ची घंटा वाजवली??

    Aadhaar Vision : BCCIचे माजी अध्यक्ष आयएस बिंद्रा यांचे निधन; भारताला क्रिकेटची जागतिक महासत्ता बनवण्यात महत्त्वाची भूमिका

    आधारमध्ये फिंगरप्रिंटऐवजी चेहऱ्याने ओळखण्याची तयारी, दरमहा 100 कोटी प्रमाणीकरणाचे लक्ष्य