प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार सत्तेतून पायउतार होण्याआधीच्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात औद्योगिक भूखंडांचे वाटपाचे निर्णय घेतले होते. त्यात अनियमितता असल्याचा ठपका ठेवत शिंदे – फडणवीस सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली. मात्र, स्थगिती उठवण्यापूर्वीच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने काही ठिकाणी (एमआयडीसी) भूखंड वाटप करून काही जमिनींचा ताबा दिल्याचे आता समोर आले आहे. MIDC plots allotted overriding government orders, now officials are in the net of an inquiry
ठाकरे – पवार सरकारने एमआयडीसीच्या अखत्यारीतील भूखंड वाटप करण्याचा निर्णय १ जून रोजी घेतला होता. त्यानंतर अवघ्या २८ दिवसांत सरकार कोसळले. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने या भूखंड वाटपाला ८ ऑगस्ट रोजी स्थगिती दिली होती.
मात्र, सरकारने स्थगिती दिल्यानंतरही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने भूखंड वाटप करून काही जमिनींचा ताबा दिला. ही बाब निदर्शनास येताच, त्यासंबंधीचा सविस्तर तपशील कागदपत्रांसह शासनाला तत्काळ सादर करावा, असे आदेश अवर सचिव किरण जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे उद्योग मंत्रालयाची परवानगी न घेता परस्पर फायलींचा निपटारा लावणारे अधिकारी आता रडारवर आले आहेत.
१९१ भूखंडांवरील स्थगिती हटवली
शिंदे-फडणवीस सरकारने ८ ऑगस्ट रोजी औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) विविध स्तरांवर वाटप केलेल्या १९१ भूखंड वाटपास स्थगिती दिली होती. या स्थगितीमुळे १२ हजार कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव रखडले होते. त्यात ‘वेदांत फॉक्सकॉन’ कंपनीचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर चौफेर टीका सुरू झाल्याने शिंदे सरकारला आपला निर्णय महिन्याभरात फिरवावा लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
MIDC plots allotted overriding government orders, now officials are in the net of an inquiry
महत्वाच्या बातम्या
- भाजप पाठोपाठ राज ठाकरेंचे टार्गेटही बारामती; पुणे दौऱ्यात मनसेत इनकमिंग
- बॉलिवूड नटी नोरा फतेहीला बांगलादेशात मनाई; आर्थिक खस्ता हलतीचे दिले कारण
- रशिया – युक्रेन युद्ध भडकण्याचा धोका; भारतीयांना लवकर युक्रेन सोडायचा सल्ला; दूतावासाची सूचना जारी
- PFI च्या गुप्त बैठका घेणाऱ्या म्होरक्यासह तिघांना एटीएस कडून पनवेलमध्ये बेड्या
- दिवाळीत महागाईचा फटका : एसटीचे भाडे 10 % वाढले, पण खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांची तिप्पट भाडे वसुली