• Download App
    वेगवान काम करून रितेश - जेनेलिया देशमुखांच्या कंपनीला एमआयडीसीचा 10 दिवसात प्लॉट; 120 कोटींचे कर्ज मंजूर!!; कंपनीचा मात्र वेगळा खुलासाMIDC plot in 10 days to Ritesh + Genelia Deshmukh's company with fast work

    वेगवान काम करून रितेश – जेनेलिया देशमुखांच्या कंपनीला एमआयडीसीचा 10 दिवसात प्लॉट; 120 कोटींचे कर्ज मंजूर!!; कंपनीचा मात्र वेगळा खुलासा

    प्रतिनिधी

    संभाजीनगर : माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांचे पुत्र, बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या कंपनीसाठी अवघ्या 10 दिवसात लातूर एमआयडीसीत भूखंड मंजूर करण्यात आला. तसेच त्यांच्या देश अॅग्रो प्रा. लिमिटेड या कंपनीला महिन्याभरातच 120 कोटी रुपयांचे कर्जही मंजूर झाले आहे. त्यामुळे लातूर एमआयडीसी भागात 2019 पासून भूखंडासाठी 16 उद्योजकाची प्रतीक्षा यादी असताना त्यांना का डावलण्यात आले?, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. यावर लातूर भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधित आरोप केले आहेत. MIDC plot in 10 days to Ritesh + Genelia Deshmukh’s company with fast work

    मात्र देश अग्रो कंपनीने हे सर्व आरोप फेटाळले असून कोणत्याही नियमबाह्य पद्धतीने कंपनीला एमआयडीसीचा प्लॉट मिळाला नसल्याचा खुलासा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

    रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या देश अॅग्रो प्रा. लिमिटेड या कंपनीला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कोणत्या निकषावर 120 कोटींचे कर्ज दिले. त्यामध्ये एवढी तत्परता कशी दाखवली?, असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. या कंपनीवर आता लातूर बँकेने आक्षेप घेतले आहेत. या बाबत पत्रकार परिषद घेत भाजपाने याचा सखोल तपास करावा अशी मागणी केली आहे.

    • देश अग्रो प्रा लिमिटेड
    • कंपनीची स्थापना किंवा नोंदणी -23 मार्च 2021
    • कंपनीचे भागीदार -रितेश विलासराव देशमुख, जिनिलिया रितेश देशमुख (प्रत्येकी 50 टक्के)
    • कंपनीचे भाग भांडवल- 7.30  कोटी
    • कंपनीची जागा : लातूर एमआयडीसी (16 लोकांचा प्राधान्यक्रमाला बाजूला सारत देशमुखांना झुकते माप दिल्याचा आरोप)
    • जागा मागणीचा अर्ज- 05 एप्रिल 2021
    • जागेची मंजुरी- 15 एप्रिल 2021 (अवघ्या दहा दिवसात जागा उपलब्ध करून देण्यात आली) प्रत्यक्षात जागेचा ताबा 22/07/2021 रोजी
    • पंढरपूर अर्बन कॉपरेटिव्ह बँकेत गेल्या वर्षी 4 ऑक्टोबर रोजी अर्ज करण्यात आला होता. त्यांनंतर त्यांना 27 ऑक्टोबर 2021 रोजी चार कोटीचे कर्ज मंजूर झाले होते.
    • 05/10/2021 रोजी लातूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक येथे कर्जासाठी अर्ज करण्यात आला. दोन वेगवेगळ्या तारखांना कोट्यवधीची कर्ज मंजूर करण्यात आली.
    • 27/10/2021 : 61 कोटी रुपये मंजूर
    • 25/07/2022 : 55 कोटी रुपये मंजूर

    ज्या कंपनीचे भाग भांडवल हे साडेसात कोटी रुपये आहे, त्या कंपनीने एमआयडीसीकडे 15 कोटी 28 लाख रुपयाची रक्कम भूखंडासाठी भरली होती.

    या प्रकरणी भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “लातूर येथील सहकारी बँक ही एका कुटुंबाच्या मालकीची असल्यासारखा हा सर्व व्यवहार सुरू आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना 5 लाख रुपये कर्ज देण्याचे घोषणा केली होती. ते अद्यापही दिले नाहीत. मात्र कुटुंबातील व्यक्तीच्या खाजगी उद्योगाला 100 कोटी पेक्षा जास्त कर्ज अवघ्या काही दिवसात दिले. या बँकेतल्या ठेवी लातूर जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आहेत. शेतकऱ्यांच्या जीवावर हे सहकार क्षेत्र मोठे झालेला आहे. असे असताना येथील सत्ताधारी मात्र ते स्वतःसाठी वापरत आहेत.”

    रितेश देशमुख यांच्या कंपनीचा खुलासा

    भूखंडावरुन जेनेलिया आणि रितेश देशमुख होणाऱ्या आरोपांबाबत Agro कंपनीने खुलासा केला आहे.

    रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी में.देश ऍग्रो प्रा.लि. नावाची एक कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून देशमुख यांना कृषी प्रक्रियेचा कारखाना सुरू करायचा आहे. भूखंडावर घेतलेले आक्षेप वस्तुस्थितीवर आधारित नाही, असा दावा कंपनीने केला आहे.

    कृषी उद्योगात वाढ व्हावी हा देश अॅग्रो कंपनीचा उद्देश आहे. भूखंड रितसर आणि नियमानुसार लिजवर देण्यात आला आहे. या उद्योगासाठी नियमानुसार कर्ज वितरीत झाले आहे. कृषी आधारित उद्योगासाठी विरोधी भूमिका घेऊ नये, असे आवाहनही कंपनीने केले आहे.

    MIDC plot in 10 days to Ritesh + Genelia Deshmukh’s company with fast work

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!