वृत्तसंस्था
मुंबई – महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणामध्ये (म्हाडा) विविध संवर्गातील ५६५ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांना १४ ऑक्टोबर रात्री २३.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत.MHADA will recruit 565 posts
म्हाडाच्या विविध मंडळातील पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामावर परिणाम होत होता. ही बाब लक्षात घेता म्हाडा प्राधिकरणाने रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विविध संवर्गातील एकूण ५६५ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
त्यामध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य) १३ पदे, उपअभियंता (स्थापत्य) १३ पदे, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी २ पदे, सहायक अभियंता (स्थापत्य) ३० पदे, सहाय्यक विधी सल्लागार २ पदे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ११९ पदे, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक ६ पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ४४ पदे, सहायक १८ पदे, वरिष्ठ लिपिक ७३ पदे, कनिष्ठ लिपिक टंकलेखक २०७ पदे, लघुटंकलेखक २० पदे, भूमापक ११ पदे, अनुरेखकाच्या ७ पदांचा समावेश आहे.
या पदांचा सविस्तर तपशील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर १७ सप्टेंबर सकाळी ११ वाजेपासून उपलब्ध राहणार आहे. म्हाडा प्रशासनाने भरती प्रक्रियेसाठी कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व एजंट म्हणून नेमलेले नाही. भरती प्रक्रियेबाबत कोणत्याही अशा व्यक्तींशी परस्पर व्यवहार करू नये; तसेच त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये.
MHADA will recruit 565 posts
महत्त्वाच्या बातम्या
- योगी सरकारची साडेचार वर्षे; गुंड – माफियांवर कायद्याचा वरवंटा; राम मंदिराचे काम सुरू झाल्याचेही भाग्य
- ठाकरे – राणे “सूत जुळले”; पण कोणत्या माध्यमातून ते वाचा…!!
- सोमय्यांविरुद्ध राष्ट्रवादीने काढले पायताण; कोल्हापुरात जिल्हाधिकाऱ्यांनी लावले 144 कलम; सदाभाभाऊंचा दादागिरीला प्रत्युत्तर देण्याचा इशारा
- राज कुंद्रा केसमध्ये नवीन माहिती आली समोर, ११९ फिल्म्स पॉर्न फिल्मचे केले शूटिंग, ८.८४ कोटी रुपयांना विकणार होता या फिल्म्स!