विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एमएमआरडीएच्या ‘मेट्रो मार्ग-4 व 4 अ, टप्पा-1, गायमुख ते विजय गार्डन स्टेशन पर्यंत मेट्रोची तांत्रिक तपासणी पार पडली, यावेळी त्यांनी चाचणीचा शुभारंभ केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे देखील उपस्थित होते.Metro connecting Mumbai – Thane
मेट्रो मार्ग 4 आणि 4 अ ची वैशिष्ट्ये :
– मेट्रो मार्ग 4 (32.32 किमी) व 4 अ (2.88 किमी) मिळून एकूण 35.20 किमी लांबीचा प्रकल्प
– 8 डब्यांची मेट्रो, एकूण 32 स्थानके, सुमारे ₹16,000 कोटी खर्च
– दररोज जवळपास 13.43 लाख प्रवासी प्रवास करतील
– मोगरपाडा येथे 45 हेक्टर जागेवर डेपो, ज्यातून मेट्रो 4, 4अ, 10 व 11 चे व्यवस्थापन होणार
– पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर, मुंबई आणि ठाणे शहर जोडणारी मेट्रो
– वडाळा ते सीएसएमटी जोडणाऱ्या मेट्रो 11 शी जोडणी झाल्यावर देशातील सर्वात लांब 58 किमी मेट्रो कॉरिडॉर तयार होणार
– प्रवासाचा वेळ 50–75% कमी, रस्त्यावरच्या वाहतुकीवरील ताण कमी
एमएमआरडीएने अनेक अडचणींवर मात करून ‘मेट्रो मार्ग 4 आणि 4ज्ञअ चे काम पुढे नेल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्देश दिले की, हे काम अधिक वेगाने पूर्ण करावे, जेणेकरून ठाणेकर आणि मुंबईकर यांना या महत्त्वपूर्ण वाहतूक सुविधेचा लाभ लवकर मिळेल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, ठाणे रिंग मेट्रोला देखील केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Metro connecting Mumbai – Thane; Metro Route 4 and 4A… A development route that saves time and energy
महत्वाच्या बातम्या
- मोदींच्या भाषणात सामान्यांना हवे ते मुद्दे जोरावर; विरोधकांचे मुद्दे वाऱ्यावर!!
- Yasin Malik, : यासीन मलिकचा कबुलीनामा- व्हीपी-मनमोहनपर्यंत 7 सरकारांनी मला चर्चेत सामील केले
- मोदींच्या GST Reforms भाषणाचे भारतीय व्यापार महासंघाकडून स्वागत; पण काँग्रेस + तृणमूल काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांची टीका
- Himachal : हिमाचलमध्ये 46 ठिकाणी ढगफुटी, 424 जणांचा मृत्यू; शिमलामध्ये भूस्खलन