या सामंजस्य करारानुसार, विविध जिल्ह्यांमध्ये उद्योजक मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, महाराष्ट्र शासन आणि देआसरा फाउंडेशन यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना प्रशिक्षण, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि व्यावसायिक विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून पाठबळ देणे हा उद्देश आहे.
या सामंजस्य करारानुसार, विविध जिल्ह्यांमध्ये उद्योजक मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांच्या माध्यमातून 5000 लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असून, यामध्ये इच्छुक उद्योजक, व्यवसाय सुरू केलेले इनोव्हेटर्स व प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्स सहभागी होतील. देआसरा ही संस्था उद्योजकांना त्यांचा व्यवसाय सुरू करणे आणि वाढवण्यासाठी आवश्यक ती मदत व मार्गदर्शन करते.
याअंतर्गत संस्था व्यवसाय व्यवस्थापन, आर्थिक सहाय्य, मार्केटिंग आणि आर्थिक साक्षरता, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सत्रे आयोजित करणे, उद्योजकांच्या क्षमता विकसित करणे आणि उद्योजकतेसाठी योग्य वातावरण तयार करणे अशी कामे ही संस्था करेल.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मंगल प्रभात लोढा आणि देआसरा या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पंडित आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Memorandum of Understanding between Maharashtra State Innovation Society Government of Maharashtra and Deasara Foundation
महत्वाच्या बातम्या
- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने नाशिकचा रामतीर्थ गोदा घाट समता, बंधुता आणि समरसतेच्या आरतीने दुमदुमला!!
- Virendra Kumar राजकीय फायद्यासाठी विरोधक आंबेडकरांचे नाव वापरत आहेत – वीरेंद्र कुमार
- Mehul Choksi : मोठी बातमी! फरार मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक
- Ram Temple Trust राम मंदिर ट्रस्टला आला धमकीचा ईमेल, तामिळनाडूशी जुडले तपासाचे धागेदोरे