प्रतिनिधी
नाशिक : भाजपचे विधान परिषदेतले फायरब्रँड आमदार गोपीचंद पडळकर यांनी कार्यकर्त्यांसह वीर सावरकर यांचे जन्मस्थळ भगूर येथील वीर सावरकर स्मारकाला भेट दिली. सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. Meeting of MLA Gopichand Padalkar at the birthplace of Veer Savarkar in Bhagur
यावेळी आमदार पडळकर म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा देशासाठी त्याग फार महान आहे. जिथे संधी मिळेल, तिथे वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करणार आहे. भारताला दिशा देणाऱ्या, भारताला सशक्त करण्याची कामगिरी करणाऱ्या वीर सावरकरांना अभिवादन करून ऊर्जा मिळाली.
मतांच्या राजकारणासाठी काँग्रेसचे लोक वीर सावरकरांवर कायम टीका करतात. त्यांनी कसल्याही पद्धतीचे घाणेरडे राजकारण केले, तरी वीर सावरकर प्रेमी चांगले काम करत आहेत. काँग्रेसने महापुरुषांचा कायमच अपमान केला आहे. सूर्यावर थुंकण्याचा काँग्रेस नेते प्रयत्न करत आहेत. पण राज्यात सावरकरांच्या विचारांचे सरकार आहे, याची आठवण आमदार गोपीचंद पडळकर यांनी करून दिली.
Meeting of MLA Gopichand Padalkar at the birthplace of Veer Savarkar in Bhagur
महत्वाच्या बातम्या