वृत्तसंस्था
मुंबई – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. परीक्षांचे नवे वेळापत्रक योग्य वेळी जाहीर करण्यात येईल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. या परीक्षा १९ एप्रिलपासून होणार होत्या. medical exams postponed in maharashtra
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वेगाने वाढू लागल्याने राज्यसह देशभरातील विविध परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर वैद्यकीय परीक्षाही पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरत होती. या पार्श्वभूमीवर अखेर सरकारी पातळीवर हालचाली झाल्या आणि वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या या परीक्षा आता येत्या जूनमध्ये घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ योग्य वेळी जाहीर करेल, अशी माहिती अमित देशमुख यांनी दिली आहे.
या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही माझी चर्चा झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
medical exams postponed in maharashtra
महत्वाच्या बातम्या
- रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन वाढविण्यावर मोदी सरकारचा भर; दरमहा ८० व्हायरल्स उपलब्ध करणार, किमतीही कमी करणार
- निर्बंधांच्या कठोर अंमलबजावणीची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी सोपविली जिल्हा प्रशासनांवर आणि पोलीसांवर
- रॉयल एनफिल्ड बुलेटच्या किंमतीत मोठी वाढ
- सुवेझ कालवा जाम करणारे एव्हर गिव्हन जहाज इजिप्तने केले जप्त, मागितली ९०० मिलीयन डॉलर्सची भरपाई
- महाराष्ट्राला रिलायन्सचा प्राणवायू, जामनगर प्रकल्पातून मिळणार १०० मेट्रिक टन ऑक्सीजन