• Download App
    Media in a hurry for Thakrey Pawar family parties unity ठाकरे बंधू आणि पवार बहीण - भावांच्या

    ठाकरे बंधू आणि पवार बहीण – भावांच्या ऐक्यासाठी माध्यमांचीच घायकुती; मुख्य नेते निवांत, इतरांच्याच लुडबूडी!!

    Thakrey Pawar family

    नाशिक : ठाकरे बंधू आणि पवार बहीण – भावांच्या ऐक्यासाठी माध्यमांनीच केली घायकुती; मुख्य नेते निवांत आणि इतरांच्याच लुडबूडी!! अशी खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था झाली आहे.Media in a hurry for Thakrey Pawar family parties unity

    ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या पुड्या दोन्ही बंधूंनी सोडून ते निवांत बसले. आता नुसती चर्चा नाही. महाराष्ट्राच्या मनात असलेली बातमीच देतो, असे सांगून उद्धव ठाकरे आज दिवसभर निवांत बसले. ते आज काहीही बोलले नाहीत. त्याउलट राज ठाकरे आज घराबाहेर पडून बहिणीकडे गेले. पण जाता जाता त्यांनी मी मातोश्रीवर चाललोय असं म्हणून पत्रकारांचीच फिरकी घेतली. पण ऐक्यावर खरा निर्णय घेणारे ठाकरे बंधू आज काहीही बोलले नाहीत.

    पण त्यांच्या होणाऱ्या किंवा न होणाऱ्या ऐक्यावर शरद पवार, देवेंद्र फडणवीस, नितेश राणे, गजानन कीर्तिकर, रामदास कदम, बाळा नांदगावकर हेच भरभरून बोलले. जणू काही महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार अशा बाता संजय राऊत यांनी मारल्या, पण त्यांच्यापैकी कुणाच्याही बोलण्याचा कुठलाही परिणाम ठाकरे बंधूंवर आज तरी दिसला नाही. ते दोघे एकमेकांशी किंवा पत्रकारांशी काहीही बोलले नाहीत.



    एकीकडे ठाकरे बंधूंच्या ऐक्याची चर्चा महाराष्ट्रात रंगल्यावर पवार बहीण भावांच्या एकत्रित येण्याची चर्चा मागे पडली. त्यात ठाकरे ब्रँडची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. पवार ब्रँड झाकोळून गेला. म्हणून मग अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पवार बहीण भावंडांच्या ऐक्याच्या चर्चेची पुडी सोडून दिली. त्यांच्या ऐक्याची “जबाबदारी” त्यांनी पांडुरंगावर घातली. पांडुरंगाच्या मनात असेल, तर येत्या आषाढी एकादशी पर्यंत बहीण भाऊ एक झालेले असतील, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला.

    वास्तविक दोन्ही पवारांच्या ऐक्याची पुडी स्वतः शरद पवारांनीच सोडून दिली होती. यावर मराठी माध्यमांमध्ये मोठी चर्चा झाली पण राष्ट्रवादीतल्या ऐक्याचा धोका प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी ओळखला. आपल्या सत्तेच्या तुकड्यात वाटेकरी येतोय हे पाहून त्यांनी ऐक्याची चर्चा गुंडाळून टाकली होती. त्यानंतर पवारांनी कानावर हात पण ठेवून घेतले होते पण ठाकरे बंधूंच्या चर्चेत ठाकरे ब्रँड मोठा होतोय हे पाहून अमोल मिटकरी यांनी पवार बहीण भावाच्या ऐक्याची पुडी पुन्हा सोडून दिली. शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार या प्रत्यक्ष निर्णय घेणाऱ्या तीन प्रमुख नेत्यांनी मात्र या चर्चेवर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

    Media in a hurry for Thakarey Pawar family parties unity

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Dhananjay Munde : माजी मंत्री धनंजय मुंडेंना 42 लाखाचा दंड का झाला !

    सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार OBC आरक्षणासह स्थानिक निवडणुका होणार म्हणजे नेमके काय घडणार??, मुख्यमंत्री फडणवीसांनी समजावून सांगितला अर्थ!!

    kothrud police harassment कोथरूड प्रकरणी महिला आयोग सक्रीय, बघा काय घेतला निर्णय