नाशिक : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाचा शिलान्यास केला. त्यांचे अनेक कार्यक्रम मेरठमध्ये झाले. पण मीडियाचे सगळे लक्ष मोदींच्या काही सेकंदाच्या व्यायामाच्या व्हिडिओवर केंद्रित झाले आहे.Media attention on Modi’s exercise video; But 700 crores, 25 districts, 16850 players … !! Do you know the exact meaning?
मोदींनी एका जीमला भेट दिली तेथे काही पुश अप्स मारले असा व्हिडिओ भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी शेअर केला आहे. मीडियाचे सगळे कॉन्सन्ट्रेशन त्या व्हिडिओवर केंद्रित झाले आहे.पण मेरठमधल्या मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाचा कार्यक्रम हा खऱ्या अर्थाने उत्तर प्रदेशासाठी, उत्तर प्रदेशातील युवकांसाठी “माईलस्टोन” ठरणार आहे. याकडे मीडियाचे साफ दुर्लक्ष झाले आहे.
या क्रीडा विद्यापीठासाठी तब्बल 700 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. या शिलान्यास कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशातील 25 जिल्ह्यांमधील 16850 खेळाडूंना खास निमंत्रण हे मोदींच्या आजच्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. याचा नेमका अर्थ मीडियाला कळतोय का…?? की उत्तर प्रदेशातल्या निवडणुकांवर फक्त राजकीय भाष्य करून बाकीच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करायचे मीडियाने ठरविले आहे?
उत्तर प्रदेशातील 25 जिल्ह्यांमधील 16850 खेळाडूंना निमंत्रण देताना छोट्यातल्या छोटी गावे, वाड्या – वस्त्या, तालुका, कसबा, जिल्हा स्तरांवरच्या वेचक-वेधक खेळाडूंना हेरून ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाच्या शिलान्यास समारंभासाठी सन्मानाने निमंत्रित करण्यात आले होते. त्या सगळ्यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आधी भेटले होते.
यातच या समारंभाचे खऱ्या अर्थाने राजकीय महत्त्व दडले आहे. हेच ते 16850 खेळाडू आहेत जे भविष्यात केव्हा ना केव्हा तरी मेजर ध्यानचंद विद्यापीठाशी संलग्न होतील…!! इतकेच नव्हे तर ही भाजपसाठी देखील क्रीडा क्षेत्रातली मोठी पायाभरणी ठरणार आहे.
आजपर्यंत ज्या छोट्या गावातल्या, वाड्या-वस्त्यां मधल्या, तालुका स्तरावरील या खेळाडूंकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत होते त्यांच्याकडे विशेष लक्ष पुरवून त्यांना सन्मानाने निमंत्रित केल्याने या खेळाडूंचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आहे आणि हेच खेळाडू आपापल्या गावात तालुक्यात मेरठमधून जाऊन भाजपचा मुक्तपणे आणि शांतपणे प्रचार करणार आहेत.
ही केवळ एका निवडणुकीपुरती गुंतवणूक मानणे देखील चूक ठरणार आहे. कारण या सर्व खेळाडूंची वये लक्षात घेता पुढची 20 वर्षे ते आपापल्या क्रीडा प्रकारात पुढे सरकणारे खेळाडू आहेत. हेच खेळाडू भविष्यात मार्गदर्शक बनून इतर खेळाडूंना तयार करणार आहेत.
एक प्रकारे विद्यापीठासाठी सातत्याने पात्र विद्यार्थी पुरवत ठेवण्याचे काम आजचे शिलान्यास समारंभाला आलेले खेळाडू करणार आहेत ही दीर्घ काळ आणि सातत्याने सुरू राहणारी प्रक्रिया आहे…!! आणि इथेच मोदींच्या आजच्या कार्यक्रमाचे खरे वैशिष्ट्य टिपताना मेनस्ट्रीम मीडियाला अपयश आले आहे…!!
Media attention on Modi’s exercise video; But 700 crores, 25 districts, 16850 players … !! Do you know the exact meaning?
महत्त्वाच्या बातम्या
- यूपीत माफिया “खेळत” होते, इथून पुढे खऱ्या अर्थाने युवक खेळांमधून देशाचे नाव रोशन करतील – मोदी
- WATCH : तुम्ही शांत रहा, हे राज्य माझं आहे डॉ. शिंगणे ज्येष्ठ नागरिकांना खडसावले; व्हिडीओ व्हायरल
- WATCH : अमरावतीमध्ये कापसाला ९५०० रुपये विक्रमी भाव आजपर्यंतचा सर्वाधिक दर, शेतकरी समाधानी
- राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची तयारी करण्याचं काम सुरु ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती