• Download App
    महापौर किशोरी पेडणेकर यांचा नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, महाराष्ट्र तर्फे गौरव |Mayor Kishori Pednekar felicitated by NUJM

    महापौर किशोरी पेडणेकर यांचा नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, महाराष्ट्र तर्फे गौरव

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मला मिळालेला पुरस्कार हा मुंबईच्या सव्वा कोटी जनतेचा असून हा पुरस्कार मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे लाडके, लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अर्पण करीत आहे, असे कृतज्ञतेचे उद्गार मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी काढले.Mayor Kishori Pednekar felicitated by NUJM

    कोरोना विरोधात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांना नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, महाराष्ट्र तर्फे गौरवण्यात आले. जीवनगौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांच्या हस्ते शिवालय येथील एका छोटेखानी कौटुंबिक वातावरणात झाला. शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरविण्यात आले. त्यावेळी पेडणेकर बोलत होत्या.



    एनयुजेमहाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर, अभिनेत्री अर्चना नेवरेकर, सामाजिक कार्यकर्त्या जॉय भोसले, पदाधिकारी संदिप टक्के, स्वप्नील शिंदे, अनिल गुरव, महेश चौगुले, संतोष राजदेव, राजू येरुणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

    पेडणेकर म्हणाल्या की दोन वर्षापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची तर मी महापौर पदाची जबाबदारी स्वीकारली. योगायोगाने कोविड त्याचवेळी सुरु झाला आणि नियतीने आमच्यावर मुंबई महाराष्ट्राची जबाबदारी आली.

    बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांच्या स्वभावाचा सुंदर मिलाफ उद्धव ठाकरे यांच्या ठायी असल्याने त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कोविड वर आपण मात करु शकलो. मुंबईकरांनी मला संपूर्ण साथ दिली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी वहिनींच्या मार्गदर्शनामुळे मला काम करणे शक्य झाले.

    योगेश वसंत त्रिवेदी यांनी आपल्या भाषणात आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांचे मुंबईत भव्य स्मारक उभे रहावे आणि महापौरांनी यासाठी पुढाकार घ्यावा तसेच सर्वच पत्रकार संघटनांनी त्यांच्या पाठीशी एकजुटीने उभे रहावे, असे आवाहन केले.

    शीतल करदेकर यांनी महापौरांच्या कार्याचा गौरव करुन पत्रकारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळावेत, त्यांची सरकार दरबारी योग्य नोंदणी करण्यात यावी, सन्मानाने सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, बोगस पत्रकारांचा सुळसुळाट कमी करण्यासाठी काय करता येईल ते पहावे, अशी आग्रही भूमिका मांडली.

    Mayor Kishori Pednekar felicitated by NUJM

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Vinod Patil : मराठा समाजाला काहीही नवे मिळाले नाही; मराठा आंदोलक विनोद पाटील यांचा पुनरुच्चार

    Devendra Fadnavis: मराठा समाजाचा GR सरसकटचा नाही; खरे कुणबी असतील त्यांना आरक्षण मिळेल- मुख्यमंत्र्यांची ग्वाही

    Controversial statement by Sunil Kedar : “ गुलामगिरी करणाऱ्या आधिकाऱ्यांना मुजरा करायला लावतो.‌” सुनील केदार यांचे वादग्रस्त वक्तव्य