विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीमध्ये सगळे इंजिन एका रांगेत उभे आहेत. सर्व हात वर करून आम्ही एकत्र आहोत, असे मोठ्या अभिमानाने सांगतात आणि पुन्हा आपापले इंजिन घेऊन वेगळ्या दिशेने निघून जात आहे, असे इंजिन काहीही कामाचे नाही? आता या तुटलेल्या इंजिनवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला. भाजप स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. Mavia or India Aghadi is a broken engine, people have no faith in him
त्यामुळे हे लोक जनतेच्या कामाचे नाही
कोणीतरी महाविकास आघाडीचे वर्णन अतिशय चांगले केले. महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल, ही आघाडी केवळ इंजिन आहे. यांना एकही डबा नाही. त्यामुळे या इंजिनमध्ये बसायची ही जागा नाही. प्रत्येक इंजिन वेगवेगळ्या दिशेने चालले आहे त्यामुळे हे जनतेच्या कामाचे नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.
श्रीकांत शिंदेंची उमेदवारी केली जाहीर
कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध नाही. श्रीकांत शिंदे कल्याणमधून महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भाजपा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेपेक्षा जास्त मतांनी आमची युती श्रीकांत शिंदे यांना निवडून आणेल, असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
तिन्ही पक्षांचा सन्मान व्हावा, हाच उद्देश
महायुतीत तीन पक्ष सोबत आहे त्यामुळे मित्र पक्षांचा सन्मान राखणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे लोकसभेच्या 33 जागा आम्ही लढणार असा आम्ही कधीही दावा केला नव्हता. आमचा प्रयत्न होता की तिघांचाही सन्मान राखून ज्या जागा मिळतील त्या जागा आपण लढल्या पाहिजे आणि तशा जागा आम्हाला मिळाल्या आहेत जयंत पाटील हे पक्षातील नेतृत्वावर नाराज आहेत. त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे, असेही फडणवीस म्हणाले.
Mavia or India Aghadi is a broken engine, people have no faith in him
महत्वाच्या बातम्या
- आम्ही घोषणापत्र आणत नाही, आम्ही संकल्पपत्र आणतो’ पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर ओढले ताशेरे
- अखिलेश यादवांची समाजवादी पार्टी अडखळली; उत्तर प्रदेशात एक दोन नव्हे, तब्बल 9 उमेदवार बदलण्याची वेळ!!
- कर्नाटकच्या अपक्ष खासदार सुमलता अंबरीश यांचा भाजपमध्ये प्रवेश
- मुख्तार अन्सारीवर विषप्रयोगाचे आरोप बिनबुडाचे, चौकशी सुरू अहवाल येईल- राजनाथ सिंह