विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकीकडे औरंगजेबाची कबर वाचवण्याची बौद्धिक कसरत; तर दुसरीकडे छावा Chhawa सिनेमावर बंदी घालायची मौलानाची मागणी!! असला प्रकार देशात सुरू झालाय.
औरंगजेबाने केलेल्या अत्याचाराचे समर्थन तर करता येत नाही, पण महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मुस्लिम व्होट बँकेला धक्का तर लागतोय या दुहेरी कात्रीत सापडलेल्या “पवार बुद्धीच्या” बुद्धिमत्तांनी औरंगजेबाची कबर वाचवण्यासाठी वेगवेगळ्या बौद्धिक कसरती सुरू केल्यात. औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचे प्रतीक असल्याचे “जावईशोध” लावलेत. त्यातच औरंगजेबाच्या नेतृत्वाखाली अखंड भारताची निर्मिती झाली.
चीनला लाथ मारून कैलास पर्वत त्याने भारतात आणला असले ऐतिहासिक संशोधन मुस्लिमांमधून समोर आले. छत्रपती संभाजी नगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगजेबाच्या विरोधात बोलायला नकार दिला औरंगजेबाच्या विरोधात मीच का बोलू??, असा बुद्धिभेदी सवाल भले मोठे सार्वजनिक पत्र लिहून त्यांनी केला.
जुना इतिहास उगाळून आत्ता मुस्लिमांविरोधात का वातावरण भडकवले जात आहे??, असे नेहमीचे युक्तिवाद समोर आले. त्याला वेगवेगळी कारणे दिली गेली. पण ही बौद्धिक कसरत आता छावा सिनेमावर बंदी घालायच्या मागणीपर्यंत येऊन ठेपली आहे.
होळी रंगपंचमी खेळायला हराम ठरवणाऱ्या मुस्लिम धर्मगुरू मौलाना शहाबुद्दीन बरेलवी यांनी छावा सिनेमावर बंदी घालायची मागणी केली. छावा सिनेमामुळे तरुणांच्या भावना भडकल्या. त्यामुळे नागपुरातली दंगल घडली, असा आरोप बरेलवी यांनी केला. त्यामुळे छावा सिनेमावर बंदी घालायची मागणी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून केली. तशी त्यांनी स्वतःच पत्रकार परिषदेत माहिती दिली.
Maulana demands ban on Chhawa movie!
महत्वाच्या बातम्या