शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या 2 कोटी रुपयांच्या गिफ्टविषयी डायरीतील नोंदीविषयी आता देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. Devendra Fadanvis : matoshri diary gift of Rs 2 crore see devendra Fadnavis reaction on shiv sena leader yashwant jadhav it raid
विशेष प्रतिनिधी
नागपूर: शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्याशी संबंधित ठिकाणी आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी छापे मारले होते. त्यात एक डायरी जप्त करण्यात आली होती. याच डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटींचं गिफ्ट दिल्याची नोंद आहे. आता याचबाबत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली.ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
‘डायरीत नेमकी काय नोंद आहे ती मी बघितलेली नाही. मात्र, आयकर विभाग ज्या काही नोंदी आहेत त्यासंदर्भात उचित चौकशी करेल मला नाही वाटत की याबद्दल मी यापेक्षा जास्त प्रतिक्रिया दिली पाहिजे.’ असं फडणवीस यावेळी म्हणाले.
दरम्यान, याचवेळी त्यांना असाही प्रश्न विचारण्यात आला की, बीएमसीच्या माध्यमातून मुंबईकरांना लुटले जात आहे का?
यावर फडणवीस असं म्हणाले की, ‘शंभर टक्के.. 24 महिन्यात 38 संपत्ती.. त्या देखील कोव्हिडच्या काळामध्ये? आम्ही आधीच म्हणत होतो कोव्हिडच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही होत नव्हते. हे आता स्पष्ट झाले आहे.’