• Download App
    कसब्यात धंगेकरांना प्राथमिक फेऱ्यांमध्ये आघाडी, पण संपूर्ण भाजपला धडा शिकवल्याची महाविकास आघाडीची उताविळी!!| Match in Kasbat primary lesson, but rush of Mahavikas match to teach lesson to entire BJP!!

    कसब्यात धंगेकरांना प्राथमिक फेऱ्यांमध्ये आघाडी, पण संपूर्ण भाजपला धडा शिकवल्याची महाविकास आघाडीची उताविळी!!

    प्रतिनिधी

    पुणे : कसबा पोटनिवडणुकीत मतमोजणीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना प्राथमिक फेऱ्यांमध्ये आघाडी मिळाली आहे मात्र त्या प्राथमिक आघाड्यांवरूनच मराठी माध्यमांमधल्या राजकीय विश्लेषकांनी आणि मराठी माध्यमांनी बातम्या देताना महाविकास आघाडीने संपूर्ण भाजपला आणि शिंदे फडणवीस सरकार धडा शिकवल्याची उताविळी दाखवली आहे.Match in Kasbat primary lesson, but rush of Mahavikas match to teach lesson to entire BJP!!

    कसबा पोटनिवडणूक ही 288 मतदारसंघांपैकी एका मतदारसंघाची निवडणूक आहे. तेथे प्राथमिक म्हणजे साधारण नऊ फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे आणि रवींद्र धंगेकरांची आघाडी कमी जास्त होत साधारण दीड हजारांवर आली आहे, तरी देखील हा महाविकास आघाडी एकत्र लढली तर काय होऊ शकते?, याची चुणूक मिळाल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि विश्लेषकांनी केला आहे.



    मतमोजणीच्या जवळजवळ 45 फेऱ्या अपेक्षित आहेत यापैकी फक्त आठ – नऊ फेऱ्या झाल्यानंतर धंगेकरांची आघाडी दीड हजाराच्या आसपास आहे. याचा अर्थ जेवढी मते मोजून झाले आहेत, त्याच्या दुप्पट मते मोजायची बाकी आहेत. तरी देखील निष्कर्ष काढण्याची उताविळी माध्यमांनी आणि माध्यमांवरच्या विश्लेषकांनी दाखविली आहे.

    निवडणुका आणि मतमोजणी हे हेलकाव्याचे गणित असते प्रत्येक ठिकाणी आघाडी पिछाडी कमी जास्त होत राहते. त्यानुसार सर्व साकल्याने विचार करूनच धडा शिकवला की धडा घेतला याविषयी बोलावे लागते. पण कसब्यात पोटनिवडणुकीच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जो नॅरेटिव्ह सेट केला होता, की मुक्ता टिळकांच्या घरात उमेदवारी दिली नाही म्हणून भाजपला धडा मिळाला हेच सांगत राहायचे शनिवार नारायण या पेठांमध्ये देखील भाजपला धक्का बसला त्याच पद्धतीचे रिपोर्टिंग मतमोजणीच्या दिवशी सकाळी 11.00 पर्यंत सुरू आहे.

    प्रत्यक्षात मतमोजणी संथ गतीने सुरू आहे आणि आकडे देखील संत गतीनेच पुढे येत आहेत त्यामुळे निष्कर्षाची घाई करणे ही पूर्णपणे चुकीचेच ठरणार आहे.

    Match in Kasbat primary lesson, but rush of Mahavikas match to teach lesson to entire BJP!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस