विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओक वर दगडफेक आणि चप्पल फेक झाल्यानंतर त्यामागचा “मास्टर माईंड” शोधण्याचे काम महाराष्ट्राचे गृह मंत्रालय करीत आहे. परंतु हा “मास्टर माईंड” शोधण्यापूर्वीच महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा “राजकीय बळी” घेण्याचे घाटत असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत.Master Mind is a political victim of Dilip Walse Patal before it was discovered
दिलीप वळसे पाटील यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे. सिल्वर ओकवरील दगडफेक आणि चप्पल फेकीच्या निमित्ताने दिलीप वळसे पाटलांचा “दुबळेपणा” उघड झाला आहे. त्यामुळे या निमित्ताने का होईना पण त्यांचा राजकीय बळी घेण्यात यावा. त्यांना गृहमंत्री पदावरून बाजूला करण्यात यावे, असे शिवसेना आणि राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांना वाटत आहे.
शिवसेनेचे प्रवक्ते मावळते खासदार संजय राऊत यांच्या निशाण्यावर दिलीप वळसे पाटील फार आधीपासून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील वळसे पाटील हे भाजप नेत्यांबद्दल सौम्य भूमिका घेतात, अशी तक्रार थेट शरद पवारांकडे केली होती. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांवर केंद्रीय तपास संस्था कठोर कारवाई करत असताना दिलीप वळसे पाटील यांचे गृहमंत्रालय मात्र थंड असते, असा आरोप मुख्यमंत्री आणि संजय राऊत यांनी केला आहे. सिल्वर ओकवर दगडफेक आणि चप्पल फेक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील दिलीप वळसे पाटील यांना निशाण्यावर घेताना दिसत आहेत. त्यांनी थेट पोलिस यंत्रणेवर उघडपणे ठपका ठेवला आहे.
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी दिलीप वळसे-पाटील यांना सिल्वर ओक येथे बोलावून घेतले आहे. त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत.
याचा अर्थ सिल्वर ओक वरील दगडफेक आणि चप्पल फेकीचा मास्टरमाईंड शोधण्याआधीच गुन्ह्याचा ठपका ठेवून दिलीप वळसे पाटील यांचा “राजकीय बळी” घेण्यात येतोय की काय??, अशी शंका व्यक्त होताना दिसत आहे.
Master Mind is a political victim of Dilip Walse Patal before it was discovered
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवारांवर गुन्हा दाखल केल्याने दबावतंत्र; आमच्या जीवाला धोका; गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटलांचा आरोप
- भारत एक प्रबळ राष्ट्र ; पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून भारताचे पुन्हा कौतुक
- शरद पवार यांच्या घरावरील हल्ला अजिबात समर्थनीय नाही, एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा , मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य