विशेष प्रतिनिधी
कल्याण: कल्याण पूर्वेतील कैलासनगर परिसरात ॲक्सिस बँकेच्या एटीएमला आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत सेंटर भस्मसात झाले. Massive fire at ATM center in Kalyan East; Burn the ATM center in a few seconds
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही आग इतकी भीषण होती की काही क्षणातच एटीएम सेंटर पूर्णपणे जळून खाक झाले आहे.
आग लागली तेव्हा एटीएममध्ये किती पैसे होते, याची माहिती मिळू शकलेली नाही त्याच बरोबर या आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही. ही आग लागली की लावण्यात आली ? याचाही सध्या तपास सुरु आहे. दरम्यान, आगीमुळे एटीएमचं बरंचस नुकसान झालं आहे.
Massive fire at ATM center in Kalyan East; Burn the ATM center in a few seconds
महत्त्वाच्या बातम्या