• Download App
    Massajog murder case मस्साजोग हत्याकांड: 81व्या दिवशी आरोपपत्र दाख;

    Massajog murder case : मस्साजोग हत्याकांड: 81व्या दिवशी आरोपपत्र दाख; खंडणी, मारहाण, खुनाची एकमेकांशी लिंक‎

    Massajog murder case

    प्रतिनिधी

    बीड : Massajog murder case मस्साजोग (ता.केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून हत्या झाली होती. या घटनेनंतर ८१ व्या दिवशी सीआयडी व एसआयटीने गुरुवारी १ हजार पानांचे दोषारोपपत्र बीडच्या विशेष मकोका न्यायालयात दाखल केले. यात आतापर्यंत ८ आरोपींना अटक झालेली असून कृष्णा आंधळे फरार आहे.Massajog murder case

    या प्रकरणात मकाेका लागू झाला आहे. न्यायालयीन चौकशीही सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी मस्साजोग ग्रामस्थ व देशमुख कुटुंबीयांनी अन्नत्याग आंदोलन केल्यानंतर विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली.



    लांबलचक आरोपपत्र आरोपींना‎ वाचवण्यासाठी : ॲड. आंबेडकर‎

    मस्साजोग प्रकरणातील‎आरोपींना वाचवण्यासाठीच पोलिसांनी १०००‎पानांचे लांबलचक दोषारोपपत्र न्यायालयात‎दाखल केले असावे, असा आरोप वंचित‎बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश‎आंबेडकर यांनी केला. गुरुवारी ते हिंगोलीत‎आले होते. हिंगोली येथे वंचित बहुजन‎आघाडीच्या कार्यकर्ता संवाद बैठकीनंतर‎त्यांनी संवाद साधला. मस्साजोग प्रकरणात‎पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले, ते‎वाचण्यासाठी न्यायालयाला आणि‎विधिज्ञांनाही वेळ नाही. त्यामुळे हजार पानांचे‎दोषारोपपत्र आरोपींना वाचवण्यासाठी दाखल‎केले असावे, असे ॲड. आंबेडकर म्हणाले.‎

    मस्साजोग प्रकरणात वाल्मीकच आका, दोषारोपपत्रात उलगडा‎

    सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात‎सीआयडी व एसआयटीने गुरुवारी १ हजार‎पानांचे दोषारोपपत्र बीडच्या विशेष मकोका‎न्यायालयात दाखल केले. आरोपींनी आधी‎खंडणी मागितली, त्यातूनच सुरक्षा रक्षकाला‎मारहाण झाली व नंतर संतोष देशमुखांचा‎खून झाला अशी मांडणी सीआयडीने‎दोषारोपपत्रात केली आहे. त्यामुळे या‎प्रकरणात दाखल तिन्ही गुन्ह्यांचे वेगवेगळे‎दोषारोपत्र न करता, वाल्मीकसह ८‎जणांविरोधात एकच दोषारोपत्र दाखल केले.‎

    सरपंच देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४‎रोजी अपहरण करुन हत्या झाली होती.‎त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे निघाले‎होते. या प्रकरणात तीन वेगवेगळे गुन्हा नोंद‎झाले होते. सुरुवातीला केज पोलिस व‎त्यानंतर सीआयडी, एसआयटीकडे तपास‎गेला होता.‎

    तीन गुन्ह्यांची लिंक अशी

    २९ नोव्हेंबर‎२०२४ रोजी वाल्मीकने आवादा कंपनीला २‎कोटींची खंडणी विष्णू चाटेच्या मोबाईलवरुन‎मागितली होती. त्याच्या वसूलीची जबाबदारी‎चाटेसह सुदर्शन घुले व सहकाऱ्यांकडे दिली‎होती. यातूनच ६ डिसेंबर २०२४ रोजी सुदर्शन‎घुले हा सहकाऱ्यांसह मस्साजोगला‎कंपनीच्या कार्यालयात गेला. तिथे सुरक्षा‎रक्षकाला मारहाण केली. सुरक्षा रक्षकाने‎बोलावल्याने सरपंच संतोष देशमुख तिथे‎गेले. त्यांच्यात व घुलेमध्ये वाद झाला. या‎प्रकरणात घुलेविरोधात गुन्हा नोंद करण्यात‎आला. या रागातून घुले याने ९ डिसेंबरला‎अपहरण करुन देशमुख यांची हत्या केली.‎अशी मांडणी सीआयडीने केली आहे.‎

    Massajog murder case: Chargesheet filed on 81st day; Extortion, assault, murder linked to each other

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    स्टील महाकुंभात महाराष्ट्र पुढच्या पाच वर्षांत ग्रीन स्टील क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आणायचा निर्धार, ग्रीन स्टील प्रमाणपत्र वाटप

    अजितदादांच्या राष्ट्रवादीला स्वबळाची उबळ, ताकद नाही त्या नागपुरात हव्यात जास्त जागा, पण पुण्यात भाजपशी घ्यायचा आहे संघर्षाचा पवित्रा!!

    ST employees strike : दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा; प्रवाशांना होणार त्रास?