• Download App
    लग्न आमच्याशी ठरलं, पण शिवसेना सत्तेसाठी कॉँग्रेस- राष्ट्रवादीसोबत पळून गेली, रावसाहेब दानवे यांची टीकाMarriage was arranged with us, but Shiv Sena ran away with Congress-NCP for power, criticized by Raosaheb Danve

    लग्न आमच्याशी ठरलं, पण शिवसेना सत्तेसाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादीसोबत पळून गेली, रावसाहेब दानवे यांची टीका

    लग्न आमच्याशी ठरले होते, पण शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत पळुन गेली. स्वत: मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आम्हाला सोडले, अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. Marriage was arranged with us, but Shiv Sena ran away with Congress-NCP for power, criticized by Raosaheb Danve


    विशेष प्रतिनिधी

    जालना : लग्न आमच्याशी ठरले होते, पण शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत पळुन गेली. स्वत: मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आम्हाला सोडले, अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

    आम्ही त्यांना युतीतून बाहेर काढले की ते स्वत:च पळून गेले, याचा निर्णय आता जनतेने करायला हवा, असे सांगून दानवे म्हणाले, कोण असली आणि कोण नकली याचा फैसला करण्याचा अधिकार मतदाराला आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनताच याचा फैसला करेल हे राज्य सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरलेले आहे. वीज प्रश्न, कोविडचा काळ, मराठा आरक्षण, धनगर किंवा ओबीसींचे आरक्षण असू द्या, सर्वच ठिकाणी ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे.



    दानवे म्हणाले, ओबीसीवर अन्याय करणे हे राज्य सरकारचे धोरण आहे. इम्पेरिकल डाटाशी केंद्र सरकारचा काही संबंध नाही, न्यायालयाने हा डाटा द्या अशी कोणतीही सुचना केली नाही. कोटार्ने जेव्हा राज्य सरकारकडे इम्पेरिकल डाटा मागत आहे. तेव्हा ती राज्य सरकारची जबाबदारी आहे.

    Marriage was arranged with us, but Shiv Sena ran away with Congress-NCP for power, criticized by Raosaheb Danve

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के