• Download App
    Marker pen ink irritates opposition बाईचा विजय नाही, शाईचा विजय ते मार्कर पेनच्या शाईवर आक्षेप!!

    बाईचा विजय नाही, शाईचा विजय ते मार्कर पेनच्या शाईवर आक्षेप!!

    Marker pen ink

    नाशिक : हा बाईचा विजय नाही, शाईचा विजय आहे, ते मार्कर पेन च्या शाईवर आक्षेप!! इथपर्यंत भारतीय लोकशाहीचा प्रवास आज येऊन ठेपला.

    – 1971 ची निवडणूक

    1971 च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींनी विजय मिळवल्यानंतर त्या वेळच्या सगळ्या विरोधकांनी हा बाईचा विजय नाही, हा शाईचा विजय आहे, अशा शब्दांमध्ये खिल्ली उडवून इंदिरा गांधींच्या विजयावर संशय व्यक्त केला होता. इंदिरा गांधींनी रशिया मधून शाई आणली. ती मतपत्रिकांवरल्या शिक्यांसाठी वापरली. तिच्यातून विरोधकांची मते पुसली, फक्त सत्ताधाऱ्यांची म्हणजे काँग्रेसची मते टिकली, असा दावा त्यावेळी विरोधकांनी केला होता. त्या वेळच्या निवडणुकीत बाईचा विजय नाही, शाईचा विजय!! ही म्हण गाजली होती.



     

    त्यानंतर अनेक निवडणुका झाल्या. त्या प्रत्येक निवडणुकांमध्ये कुठल्या ना कुठल्या मुद्द्यांवर वाद झाले. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आक्षेप घेतले. अर्थातच अनेकदा विरोधक आणि सत्ताधारी बदलले होते. कालचे विरोधक आजचे सत्ताधारी आणि कालचे विरोधक आजचे सत्ताधारी झाले होते. पण निवडणुकांमधले वाद आणि आक्षेप थांबले नव्हते.

    – मार्कर पेनच्या शाईवर आक्षेप

    2026 च्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने अनेक ठिकाणी मार्कर पेनची शाई वापरली. तिच्यावर सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सुप्रिया सुळे आणि अन्य विरोधकांनी आक्षेप घेतले. निवडणूक आयोगाने समोर येऊन खुलासे देखील केले. मार्कर पेनची शाई पुसून कुणीही दुबार मतदानाला येऊ शकणार नाही तशी काळजी आधीच घेतली आहे कारण प्रत्येक मतदाराच्या बोटाला लावण्यापूर्वी त्याच्या नावाचे व्हेरिफिकेशन झाले आहे आणि त्याची सही देखील घेतली आहे त्यामुळे निवडणूक कर्मचारी आणि अधिकारी दुबार मतदार रोखतील असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. पण मार्कर पेनच्या शाईवर आक्षेप नोंदविण्याचे विरोधकांनी थांबविले नाही.

    त्यामुळेच आज महापालिका निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी भारतीय लोकशाहीचा प्रवास बाईचा विजय नाही, शाईचा विजय आहे, इथपासून ते मार्कर पेनच्या शाई पर्यंत येऊन ठेपला. 15 जानेवारी 2026 रोजी हा “इतिहास” घडला.

    Marker pen ink irritates opposition

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Exit polls : मुंबईत ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उखडली; काँग्रेस आणि ठाकरे यांची फारकत एकमेकांनाच नडली!!

    Exit polls : अजितदादांच्या दादागिरीवर महेश दादाच भारी; पिंपरी चिंचवड मध्ये मारली बाजी!!

    कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना सुप्रिया सुळे बसल्या घरात; पण मतदानाच्या दिवशी सगळी मतदान प्रक्रियाच टाकली संशयाच्या भोवऱ्यात!!