विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी :अनेक ठिकाणी बदलत्या हवामान आणि अवकाळी पावसामुळे जसा अन्य पिकांना फटका बसला तसाच तो फुलशेतीला सुद्धा बसला आहे. त्यामुळे फुलांची आवक कमी झाली आहे. झेंडूच्या फुलांना शेवंतीचा भाव मिळत आहे.Marigold flowers Shevanti’s price
सध्या मार्गशीर्ष महिना सुरूअसून दर गुरुवारच्या पूजेसाठी झेंडूच्या फुलांची मागणी अधिक असते तसेच नित्य पूजेसाठी देखील ही फुले वापरली जातात त्यातच लग्नसोहळेअसल्यामुळे हार-तुरे, वेणी इत्यादीसाठी जशी गुलाबाच्या फुलांना मागणी तशीच शेवंतीच्या फुलांना देखील जास्त प्रमाणात मागणी असते.
शेवंती फुलांचे दर २३० ते २५० रू. किलोवर गेले आहेत. झेंडूची आवक कमी झाल्यामुळे झेंडूच्या फुलाचे दरही वाढले आहेत . एरवी १०० ते १२० रु. किलो मिळणारी झेंडूची फुले सध्या २५० रुपये घरात जाऊन पोचले आहेत. एकंदरीतच अवकाळी पाऊस आणि वाढलेली महागाई या दोन्हीचा परिणाम या फुलांच्या दर वाढीवर झाल्याचे चित्र पाहायला मिळते.
- झेंडूच्या फुलांना शेवंतीचा भाव
- आवक घटल्याने दरवाढ झाली
- अवकाळी पावसाचा परिणाम
- शेवंती फुलांचे दर २३० ते २५० रू. किलोवर
- झेंडूची फुले सध्या २५० रुपये किलोच्या घरात