• Download App
    मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात 2 दिवस गारपिटीचा इशारा, ऑरेंज अलर्ट; रब्बी पिकांचे नुकसान|Marathwada, West Maharashtra 2 days hail warning, orange alert; Damage to rabi crops

    मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात 2 दिवस गारपिटीचा इशारा, ऑरेंज अलर्ट; रब्बी पिकांचे नुकसान

    विशेष प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर : राज्यात उत्तर व पश्चिम महाराष्ट्र, कोकण तसेच मराठवाड्यात आज सोमवारीही (दि. 27) जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी तसेच विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांत दोन दिवस गारपिटीचा जोर राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.Marathwada, West Maharashtra 2 days hail warning, orange alert; Damage to rabi crops

    येलो आणि ऑरेंज अलर्ट

    रविवारी (ता. 26) उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागात मेघ गर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात तुरळक ठिकाणी गारपीट झाली. आज (ता.२७) विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसासह गारपिटीचा ‘ऑरेंज अलर्ट’ तर मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात विजांसह पाऊस, गारपिटीचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.



    का झाली अचानक गारपीट

    हवामान खात्याने येत्या २४ तासांत महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातच्या काही भागात मुसळधार पाऊस, गारपीट आणि जोरदार वाऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याबाबत हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, पूर्व व पश्चिम वारा प्रणालींच्या संयोगातून गारपिटीची शक्यता अधिक वाढली आहे. अरबी समुद्रात मालदीव ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत पश्चिम किनारपट्टी समांतर दीड किलोमीटर उंचीचा हवेच्या कमी दाबाच्या आस तयार झाला आहे. तसेच चक्रवातामुळे गुजरातपासून ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत पावसाचे वातावरण आहे.

    राज्यात 30 नोव्हेंबरनंतर थंडीचा कडाका वाढणार

    राज्यातील ढगाळ वातावरण 30 नोव्हेंबरनंतर निवळणार असून त्यानंतर थंडीचा कडाका वाढणार असण्याची शक्यता आहे. गारपीट झाल्यामुळे संभाजीनगर, नाशिकसह राज्यात रविवारी रात्रीपासूनच गारठा वाढला हाेता.

    Marathwada, West Maharashtra 2 days hail warning, orange alert; Damage to rabi crops

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ