• Download App
    Marathwada and Solapur; Exact figures of damage caused by heavy rains and subsequent relief are outमराठवाडा आणि सोलापूर; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आणि त्यानंतरच्या मदतीची नेमकी आकडेवारी समोर

    मराठवाडा आणि सोलापूर; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आणि त्यानंतरच्या मदतीची नेमकी आकडेवारी समोर

    Marathwada and Solapur

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि सोलापूर जिल्हाधिकार्‍यांकडून सोलापूर जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला. यातून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आणि मदतीची नेमकी आकडेवारी समोर आली. नागरिकांना मदत करताना अधिकाऱ्यांनी फिल्डवर राहावे. केवळ नियम आणि कायद्यावर बोट ठेवून काम करू नये मदत करताना सरळ हात असावा अशा सक्त सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

    सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत पुराच्या स्थितीतून 4002 लोकांना वाचविण्यात आले असून, 6500 लोक हे मदत शिबिरांमध्ये आहेत. तेथे भोजन, पाणी आणि आरोग्याच्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. जेथे गावांमध्येही भोजन पुरविण्याची गरज आहे, तेथे अक्षयपात्र फाऊंडेशनचे सहकार्य प्रशासनाला होते आहे.

    गावांमध्ये चार्‍याच्या समस्या पाहता चारापुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले असून, उद्यापासून ही व्यवस्था अधिक क्षमतेने कार्यान्वित होईल.



    नुकसान झालेल्या घरांच्या पंचनाम्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु असून, 10 किलो तांदूळ, 10 किलो गहूसह तातडीची मदत म्हणून 10,000 रुपये दिले जात आहेत. नाम फाऊंडेशन सुद्धा प्रशासनाला सहकार्य करते आहे. जिल्ह्यातील उद्योजक, मान्यवर अशा मंडळींना एकत्र करुन प्रशासनाने समन्वयातून काही नियोजन केले आहे. जिल्हास्तरिय आणि तालुकास्तरिय मदत कक्ष अशी रचना करण्यात येत आहे.

    उद्यापासून मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरांचेही नियोजन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

    – बीड जिल्ह्यातली 17 धरणे 100 % भरली

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीडच्या जिल्हाधिकार्‍यांकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
    बीड जिल्ह्यातील 17 धरणे 100 % भरली असून, 2 धरणे ही 90 टक्क्यांच्या आसपास आहे. केवळ माजलगावमधून विसर्ग करण्यात येत आहे.

    वडवणी तालुक्यात काही गावांचा संपर्क तुटला आहे. तेथे आवश्यक ती मदत पुरविली जात आहे. एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराचे पथक बीडमध्ये सज्ज असून, ते बचावकार्य करीत आहेत. सुमारे 48 मंडळात काल अतिवृष्टी झाली आहे.

    नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून, परिस्थिती उदभवल्यास त्यांना स्थानांतरित करण्यात येईल. आष्टीमधून 60 नागरिकांना सुरक्षित हलविण्यात आले आहे.
    – सप्टेंबरपासून 2567 कुटुंबांना सुरक्षित स्थलांतरित करावे लागले. 10 लोकांना प्राण गमवावे लागले. त्यापैकी 8 कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.

    जालना जिल्हा

    – जालना जिल्ह्यातील सुमारे 26 मंडळात अतिवृष्टी
    – जिल्ह्यातील 51 पैकी 48 प्रकल्प ओव्हरफ्लो
    – भोईपूर, अर्जूननगर, लालबाग, खांडसरी येथील 225 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले, 52 नागरिकांची पूरस्थितीतून सुटका करण्यात आली
    – जूनपासून 9 नागरिकांचे मृत्यू, 7 मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली

    लातूर जिल्हा

    – लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, निवडी, उदगीर, चाकूर, रेणापूर, जळकोट आदी भागात नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. 500 हून अधिक नागरिकांना मदत शिबिरांमध्ये ठेवण्यात आले आहे.
    – एकूण 60 रस्ते किंवा पूल पाण्याखाली होते, ते आता वाहतुकीसाठी मोकळे करण्यात आले आहेत.
    – जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात असली तरी एनडीआरएफ पथके राखीव ठेवण्यात आली आहेत.

    नांदेड जिल्हा

    – नांदेड जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी 23, तर 28 सप्टेंबर रोजी 13 मंडळात अतिवृष्टी झाली. गोदावरी, मांजरा, मन्याड नद्यांच्या लाभक्षेत्रात पूरस्थिती निर्माण झाली. 67 लोकांना सुरक्षित वाचवण्यात आले आहे.
    – नांदेडमध्ये 304 आणि लोहामध्ये 120 लोकांना मदत शिबिरात ठेवण्यात आले असून, त्यांना सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. एकूण 16 मदत शिबिरे तयार करण्यात आली आहेत. 56 घरांची पडझड झाली असून, त्यांना तातडीने मदत देण्याची कार्यवाही सुरु आहे.

    परभणी जिल्हा

    – परभणी जिल्ह्यातील 23 आणि 24 सप्टेंबर रोजी 36 गावांचा संपर्क तुटला होता. काल 17 गावांना पूरस्थितीचा सामना करावा लागला.
    – 1386 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
    – जूनपासून आतापर्यंत 6 व्यक्तींच्या मृत्यूची नोंद झाली असून, त्या सर्वांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.
    – जनावरांचे मृत्यू झालेल्यांना सुद्धा आर्थिक मदत देण्यात आली असून, 203 घरांचे नुकसान झालेल्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे.
    – कलावंत, सामान्य नागरिक मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

    हिंगोली जिल्हा

    -हिंगोली जिल्ह्यात जवळजवळ 23 मंडळात पावसाने नुकसान झाले आहे. 10 गावांचा संपर्क तुटला असून, आता पाणी हळूहळू ओसरते आहे.
    – 231.27 कोटी रुपये या जिल्ह्यात वितरणासाठी देण्यात आले असून, त्याची कार्यवाही त्वरेने करण्यास सांगण्यात आले आहे.
    – 13 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले, त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. जनावरे गमवावे लागलेल्यांपैकी काहींना मदत दिली असून, उर्वरित मदत वितरित करण्याचे काम वेगाने सुरु आहे.

    छत्रपती संभाजीनगर जिल्हा

    – जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान 581.7 मि.मी. इतके आहे. आतापर्यंत 818.5 मिमी. इतका पाऊस झालेला आहे. सुमारे अडुसष्ठ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.
    – 133 पक्क्या तर 291 कच्च्या घरांची पडझड झाली आहे. त्यांना मदत देण्याची कार्यवाही सुरु आहे.
    – पैठणमधून नागरिकांना शाळा, मंगल कार्यालये येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे.

    धाराशिव जिल्हा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धाराशिव जिल्हाधिकार्‍यांकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
    – जिल्ह्यात 6 गावांचा संपर्क तुटला असून, 3615 व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अठ्यांशी घरांची पडझड झाली असून, त्यांना तातडीने मदत देण्यास सांगण्यात आले आहे.

    Marathwada and Solapur; Exact figures of damage caused by heavy rains and subsequent relief are out

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    सोलापुरात 4002 लोकांना पूरस्थितीतून वाचाविले; 6500 लोक मदत शिबिरांमध्ये दाखल; उद्यापासून आरोग्य शिबिरांचे आयोजन

    मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना मदत शिबिरांमध्येच थांबवा, सर्व सोयी सुविधा पुरवा; मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश

    जनसेवेतून आदिवासी जीवनमान उंचावणारे डॉ. प्रकाश आमटे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धुळ्यात “या” पुरस्काराने सन्मान