विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने मराठीला दिला अभिजात भाषेचा दर्जा, पण तो काँग्रेसला टोचला!! महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची स्वप्नपूर्ती झाल्याने अवघा मराठी माणूस आनंदला, पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हा निर्णय निवडणूक जुमला वाटला. कारण ते स्वतःच तसं बोलले. Marathi was given the status of classical language
वास्तविक 2004 मध्ये केंद्रात काँग्रेस प्रणित यूपीए सरकार असताना त्या सरकारने फक्त तमिळ भाषेला अभिजात दर्जा दिला होता 2005 मध्ये संस्कृत भाषेला, 2008 मध्ये कन्नड आणि तेलुगु भाषांना तर 2013 मध्ये मल्याळम भाषेला यूपीए सरकारने अभिजात भाषांचा दर्जा दिला. त्या प्रत्येक निर्णयाच्या वेळी मराठी भाषेचा तो हक्क असताना देखील यूपीए सरकारने तो डावलला. 2004 ते 2014 या काळात महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या आघाडीचे सरकार होते त्या सरकारांनी देखील मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी आपल्याच यूपीए सरकारकडे पुरेसा पाठपुरावा केला नव्हता. त्यामुळे काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने मराठी भाषेच्या अभिजात दर्जाची मागणी गांभीर्याने घेतली नव्हती. Marathi
पण आता मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबरोबर काँग्रेसला मात्र तो निर्णय टोचला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मुखातून तो बाहेर आला त्यांना हा निर्णय म्हणजे निवडणूक जुमला वाटला. Marathi
शरद पवारांनी 17 आणि 18 जुलै 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे हा मराठी जणांचा अधिकार आहे असे म्हटले होते. परंतु दिल्लीतली काही मंडळी वेगळी भूमिका घेतात, अशी तक्रार त्यावेळी त्यांनी मांडली होती. पण 2004 ते 2014 10 वर्षांमध्ये ते यूपीए सरकारमध्ये कृषिमंत्री होते. त्या सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का दिला नाही??, याविषयी मात्र भाष्य करणे त्यावेळी पवारांनी टाळले होते. Marathi
Marathi was given the status of classical language
महत्वाच्या बातम्या
- PM Modi : पंतप्रधान मोदींचे नीरज चोप्राच्या आईला पत्र; चुरमा पाठवल्याबद्दल आभार, ते खाऊन भावुक झालो!
- Congress strike : लोकसभेतील स्ट्राईक रेटच्या बळावर काँग्रेसने अखेर ठाकरे + पवारांना मागे रेटलेच!!
- Thailand : थायलंडमध्ये स्कूल बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू, टायर फुटल्याने अपघात; 5 शिक्षकांसह 44 जण होते स्वार
- Pawar NCP : एरवी सनातन धर्मावर टीकाटिप्पणी, पण आता नवरात्राच्या 9 दिवसांचा पवारांच्या राष्ट्रवादीकडून आंदोलनासाठी वापर!!