विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिंदे – फडणवीस सरकार मध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून सामील झाल्यानंतर अद्याप त्यांचे आणि राष्ट्रवादीच्या इतर 8 मंत्र्यांचे खाते वाटप झालेले नाही. या मुद्द्यावर भाजपची स्ट्रॅटेजी ताकास तूर न लागू देण्याची आहे पण तरी देखील राष्ट्रवादी पेक्षा मराठी माध्यमेच त्यांच्या खाते वाटपाविषयी उतावीळ झाली आहेत. Marathi media helpless before BJP BJP strategy, as their predictions fail every time
शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून आत्तापर्यंत मराठी माध्यमांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे अनेक पतंग उडवले, पण एकदाही कोणत्याही माध्यमाचे भाकीत केव्हाही खरे ठरले नाही आणि प्रत्यक्ष मंत्रिमंडळ विस्तार जेव्हा झाला, त्याच्या आसपास एकदाही मराठी माध्यमे आपल्या “सूत्रांच्या हवाल्याने” खऱ्या बातम्या देऊ शकली नाहीत.
अजितदादा त्यांच्या गटासह राष्ट्रवादीतून बाहेर आले. त्यांनी स्वतःच राष्ट्रवादी असल्याचा दावा केला. 9 मंत्र्यांसह अजितदादांनी शपथ देखील घेतली पण त्या काळातही म्हणजे 30 जून, 1 जुलै, 2 जुलै 2023 या 3 दिवसांमध्ये मराठी माध्यमे त्यांच्या बंडाचे अचूक भाकीत करू शकली नव्हती. वास्तविक 30 जून रोजी अजितदादांनी आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे दिला, ते मराठी माध्यमांना कळू शकले नाही.
इतकेच काय, पण दरम्यानच्या काळात भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी अजितदादांच्या अनेकदा वाटाघाटी झाल्या. पण त्याची साधी भनक देखील मराठी माध्यमांना लागू शकली नव्हती.
पण आता जेव्हा अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन अन्य 8 मंत्र्यांनी त्यांच्याबरोबर मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, त्यावेळी या सर्व मंत्र्यांना जेवढी आपल्या खाते वाटपाविषयी उत्सुकता नाही, त्यापेक्षा जास्त उत्सुकता आणि उतावीळी मराठी माध्यमांना आहे. मराठी माध्यमे यासाठी घायकुतीला आली आहेत. त्यामुळे अजितदादांना अर्थ खाते मिळणार, महसूल खाते मिळणार, सार्वजनिक बांधकाम खाते मिळणार, भाजपच्या मंत्र्यांना आपल्या खात्यांचा त्याग करावा लागणार, देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या 16 आमदारांसह अपात्र होणार आणि त्यानंतर अजितदादाच मुख्यमंत्री होणार, असे एक ना अनेक पतंग मराठी माध्यमे उडवत आहेत.
पण आत्तापर्यंत मराठी माध्यमांची कोणतीच भाकिते खरी झाली नव्हती. तशीच वासलात अजितदादा आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांच्या खाते वाटपाबद्दल मराठी माध्यमांनी केलेल्या भाकीतांची होण्याची शक्यता आहे. कारण भाजपची आपल्या राजकीय धोरणाविषयी कोणासही ताकास तूर न लागू देण्याची स्ट्रॅटेजी आहे.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापर्यंत आणि राज्यातल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचण्याची आणि त्यांच्याकडून “खरी बातमी” काढून घेण्याची मराठी माध्यमांची ताकदच उरलेली नाही!!
Marathi media helpless before BJP BJP strategy, as their predictions fail every time
महत्वाच्या बातम्या
- ‘’माणूस पिसाळला की, त्याला भान राहत नाही; महाराष्ट्राला लागलेला तुम्ही कलंक आहात’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंवर पलटवार!
- पोस्ट ऑफिसच्या “या “आठ योजना तुमच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्हाला करतील मालामाल
- उद्धव ठाकरेंनी नागपूरला लागलेला कलंक म्हटल्यावर देवेंद्र फडणवीसांचही ‘कडक’ प्रत्युत्तर, म्हणाले…
- फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना सुनावले “कलंकीचा कावीळ” म्हणजे काय?? वाचा त्यांच्याच शब्दांत!!