• Download App
    शरद पवारांचे (न)पंतप्रधान पद ते पंकजा मुंडेंचे कोणतेही (न)पद; माध्यमांचे आवडते "राजकीय खाद्य"!! Marathi media always discusses sharad Pawar and Pankaja munde's over ambitions with interest

    शरद पवारांचे (न)पंतप्रधान पद ते पंकजा मुंडेंचे कोणतेही (न)पद; माध्यमांचे आवडते “राजकीय खाद्य”!!

    विनायक ढेरे

    नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार तब्बल 32 दिवसांनी झाला. त्यामध्ये एकाही महिला मंत्र्याला स्थान दिले नाही. यावरून माध्यमांमध्ये आधीच चर्चा सुरू असताना त्यातही माध्यमांनी आजपासून एक उपचर्चा घडवायला सुरुवात केली आहे, ती म्हणजे पंकजा मुंडे यांची रक्षाबंधनाच्या निमित्ताने मंत्रिमंडळ विस्तारावर नाराजी आहे!! Marathi media always discusses sharad Pawar and Pankaja munde’s over ambitions with interest

    पंकजा मुंडे यांनी नव्या मंत्र्यांना आधीच शुभेच्छा दिल्या आहेत. त्या सध्या विधानसभा अथवा विधान परिषद या दोन्ही सदनाच्या सदस्य नाहीत. त्या मध्यप्रदेश भाजपच्या सहप्रभागी आहेत. त्यांच्या त्या कामाविषयी माध्यमे चर्चा करत नाहीत. मध्यप्रदेश मधल्या भाजपच्या कामाविषयी त्यांना प्रश्न विचारत नाहीत. पण जेव्हा महाराष्ट्र भाजप मधल्या कोणत्याही पदांच्या वाटपाची वेळ येते, तेव्हा मराठी माध्यमे पंकजा मुंडे यांची चर्चा आवर्जून घडवत राहतात. मग केंद्रीय मंत्री पदापासून, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद ते विधान परिषदेच्या उमेदवारीपर्यंत मुंडे भगिनींची चर्चा असते. किंबहुना मराठी माध्यमे ही चर्चा घडवत राहतात.


    फडणवीसांचे मंत्रिमंडळ माध्यमांनी “ठरवले”; त्यातून पंकजा मुंडे यांना स्वतःच “वगळले”!!


    – पवार ते मुंडे राजकीय खाद्य

    शरद पवारांच्या पंतप्रधानपदापासून ते युपीए अध्यक्ष पदापर्यंत त्यांना न मिळालेल्या किंवा न मिळवू शकलेल्या पदांनी गेल्या 30 वर्षांमध्ये मराठी माध्यमांना जसे “राजकीय खाद्य” पुरवले आहे, त्या खालोखाल 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांच्या नावाने देखील मराठी माध्यमे “राजकीय खाद्य” पुरवले आहे. हे राजकीय खाद्य मराठी माध्यमे आनंदाने खात असतात.

    आज 11 ऑगस्ट 2022 रोजी पंकजा मुंडे यांनी महादेव जानकर यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी केले. त्यावेळी शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले. यापैकी प्रश्नाला उत्तर देताना पंकजा मुंडे यांनी, कदाचित माझी पात्रता वाटली नसेल म्हणून त्यांनी म्हणजे (भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी) मला मंत्रिपद दिले नसेल. मी पात्र होईन तेव्हा कदाचित ते देतील, असे वाक्य उच्चारले. परंतु, त्याचवेळी ज्यांनी मी आधीच नव्या मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मंत्रिमंडळात महिलांना स्थान हवे. केवळ एखादा मुस्लिम म्हणजे अल्पसंख्यांक किंवा एखादी महिला मंत्री करून तेवढ्यापुरते प्रतिनिधित्व असू नये. मला महिला असून आधीच्या सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री पदाची संधी मिळाली तशा पद्धतीचे प्रतिनिधित हवे, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

    यावरूनच माध्यमांनी पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या बातम्या चालवल्या आहेत. विधान परिषदेच्या उमेदवारीवरून साधारणपणे महिना दीड महिन्यापूर्वी माध्यमांनी अशाच बातम्या चालवल्या होत्या. त्यानंतर मध्ये बराच गॅप पडला. पण आजच्या रक्षाबंधनाच्या राजकीय मुहूर्तापासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरून पुढचे काही दिवस तरी पंकजा मुंडे यांना “न मिळालेली संधी” हा मराठी माध्यमांसाठी “राजकीय खाद्याचा” विषय असेल!!

    Marathi media always discusses sharad Pawar and Pankaja munde’s over ambitions with interest

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!